सांगली : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळेच संतप्त कार्यकर्त्यांनी आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्याला जाणारी उसाची वाहने सोमवारी रात्री फोडली. सांगली तासगाव रस्त्यावर कुमठे फाटा येथे ही घडली. त्यात दोन ट्रॅक्टर आणि एक ट्रकची तोडफोड करुन हवा सोडण्यात आली आहे. आरग येथील कारखान्याने गतवर्षी एकरकमी एफआरपी दिली होती. मात्र यंदा त्यांनी अद्याप एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळे कवठेएकंद येथून आरगकडे जाणारी वाहने अडवून त्यांची हवा सोडली. वाहनावर दगडफेक केली.
हेही वाचा: ‘रिफायनरीला काँग्रेसचा विरोधच; प्रदेशाध्यक्षांची मते जाणून घेणार’
सोमवारी दुपारी भिलवडी परिसरात स्वाभिमानीचकडून ऊसाची वाहने अडवली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त, कुंभी- कासारी, दत्त सहकारीसह दहा कारखान्यांनी व शेजारच्या कर्नाटक राज्यातील शिरगुप्पीसह काही कारखान्यांनी एकरक्कमी एफआरपी जाहीर केली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. जे एकरक्कमी एफआरपी जाहीर करतील ते कारखाने सुरू राहतील, मात्र जे दर जाहीर करणार नाहीत ते कारखाने बंद पाडू, तोडी बंद पाडू असा इशारा संघटनेने दिला होता. ऊस तोडी सुरु झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होत आहेत.

जयसिंगपूर येथे ऊस परिषद नुकतीच झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक रकमी एफआरपी आणि वाढीव साखरेचा दर गृहीत धरून ३०० रुपये जानेवारीत द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसाच ठराव परिषदेत झाला आहे. यानुसार कोल्हापुरातील दहा कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली. त्यांच्या ऊस तोडी सुरुचा निर्णय झाला, मात्र त्यांनी वाढीव ३०० रुपये जानेवारी महिन्यात द्यावेत अन्यथा ते कारखाने जानेवारीत बंद पाडले जातील. मात्र एफआरपी जाहीर न केल्या, त्यांच्या तोंडी बंद पाडल्या जातील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
हेही वाचा: शेकडो शेतकरी असताना फक्त २३ साक्षीदार कसे? सुप्रीम कोर्टाचा सवाल
Esakal