आजच्या जगात स्वतंत्र व्यक्ती म्हणवून घेण्यासाठी प्रत्येकाकडे काही गोष्टी, कौशल्ये असणं अपेक्षित आहेत. प्रत्येक माणसाला एका विशिष्ट वयात ती माहित होणं आवश्यक आहे. स्त्रिया देखील अशा पुरुषांचा अधिक आदर करतात आणि लग्नावेळी त्यांचा जास्त विचार करतात. त्यामुळे तुम्हाला स्वावलंबी व्हायचे असेल आणि त्याच वेळी महिलांना प्रभावित करायचे असेल तर ही कौशल्ये विकसित करायला हवीत.

स्वावलंबी जगण्यासाठी सर्व पुरुषांना या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

साध्या पण गरजेच्या गोष्टी शिका :
आम्ही असं अजिबात म्हणणार नाही की, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वगैरे विषयात पदवी मिळवली पाहिजे. परंतु घरातील लाईटचा बल्ब कसा बसवावा, आपल्या इलेक्ट्रिक केटलमधील कार्बन कसे स्वच्छ करावे किंवा वॉशिंग मशीन कसे सेट करावे या साध्या साध्या गोष्टी आपल्याला माहित असणे महत्वाचे आहे. अशा दैनंदिन आयुष्यातील मुलभूत साधनांना कसं हाताळायचं याची माहिती करुन घ्यायला हवी.
चांगली कॉफी किंवा चहा बनवा : सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचा नाश्ता हे तुमच्या पोटात जाणारे पहिले जेवण असते. तुमचा सकाळचा चहा किंवा कॉफी बनवायला शिका. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत राहता तेव्हा तिलाही मदत करा.
झटपट करता येणारे पदार्थ शिकून घ्या :
आपल्याला आवडणारी पेय कशी बनवावी हे माहिती असायलाच हवं, त्याचप्रमाणे जेवण कसे शिजवावे हेही आपल्याला माहित असायाला हवं आहे. पारंपारिक खिचडीसह किमान पदार्थ जाणून घ्या. आपल्या घरात नियमित बनणाऱ्या दोन आणि दोन फॅन्सी डिश तुम्हाला बनवता यायला हव्या. अडचणीच्या काळात तुमचे हे कौशल्य तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल.
शिवणकाम :
बटन लावण्यापासून ते अगदी शिवणकाम कसे करायचे हे फक्त महिलांनाच माहित असावं असं नाही. तसं पाहिले तर या गोष्टी महिलांना स्वावलंबी बनवतात. पण याच चष्यातून पाहिले तर पुरुष त्यांच्यावर अवलंबून राहतात. आज कोणतीही स्त्री अशा व्यक्तीला शोधत नाही, जी तुटलेली बटणं, किंचित फाटलेली बाही इत्यादींची काळजी घेऊ शकत नाही, त्याची काळजी घेण्याचे इतर मार्ग असले तरीही सुई आणि धाग्याने कसे काम करावे हे शिकले पाहिजे. हे कौशल्य कधी कामी येईल, ते सांगता येत नाही.
आर्थिक गुंतवणूक :
पैसे मिळवणे महत्ताचं आहे आणि तितकंच त्यांचा योग्य वापर करणंही महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे खर्च करण्यासाठी स्वतःचे पैसे असायलाच हवेत, आणि ते कसे खर्च करायचे याचं ज्ञानही असायला हवं. तुम्ही पैसे योग्य ठिकाणी वापरणं आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. वाचवलेले पैसे भविष्यात कुठे वापरायचे याचा प्लॅन करा. तुमच्या खात्यात ट्रॅव्हल ट्रिपसाठी पैसे असले पाहिजेत. तुम्‍हाला वैद्यकीय विमा वगैरे असल्‍याचीही खात्री करणे आवश्‍यक आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here