
अभिनेत्री रिंकू राजगुरूनं मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलंय.

रिंकू सोशल मीडियावर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिनं सैराट चित्रपटातून पदार्पण केलंय.

या चित्रपटानंतर आता रिंकूत खूप मोठा बदल झालेला पहायला मिळतोय. नुकतेच रिंकूनं सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

रिंकूनं साडीतील फोटो पोस्ट केले असून तिचे हे फोटो पाहून खरंच याडं लागेल.. असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

रिंकूनं 2013 मध्ये सैराट चित्रपटासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेत, ऑडीशन दिली होती. 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटानं अफाट प्रसिद्धी मिळवली.

रिंकूनं परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आलंय. या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Esakal