पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt Amarinder Singh) यांच्या महिला मैत्रिण अरुसा आलम (Aroosa Alam आणि आयएसआय (ISI) सोबतच्या तिच्या संबंधांबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या दरम्यान अमरिंदर सिंग यांनी या सगळे चर्चेदरम्यान अरुसा आलम यांचे देशातील अनेक बडे नेते आणि भारतीय सेलिब्रिटींसोबत काढलेले फोटो त्यांच्या फेसबुकवर शेअर केले आहेत. यासोबतच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यासोबतच असा प्रश्न विचारला आहे की, या सर्व लोकांचे आयएसआयशी संबंध आहेत का?

कॅप्टन कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, सोनिया गांधी, चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट, पुर्व केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा, माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार, बॉलीवूड अभिनेते दिलीप कुमार, मुलायम सिंह यादव यांसारखे राजकारण तसेच चित्रपट जगातील अनेक दिग्गज या दिसत आहेत.
अरुसा आलम ही कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याच खूप दिवसांपासून मैत्री आहे आणि दोघे अनेक प्रसंगी एकत्र आले आहेत.
पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर रंधावा यांनी अरुसा आलमचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचे म्हटले असून चौकशीची मागणी केली आहे.
अरुसा आलम ही एक पाकिस्तानी पत्रकार आहेत आणि ती पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित पत्रकार राहिल्या आहेत. त्यांचा पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयशी (ISI) संबंध असल्याचा आरोप होत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग यांची अरुसा यांची पहिली पहिली भेट 2004 मध्ये त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान झाली होती. 2006 मध्ये जालंधरमध्ये भेटल्यानंतर ही मैत्री वाढत गेली.
त्यानंतर जालंधर येथील पंजाब प्रेस क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमात पत्रकारांच्या निमंत्रणावरून त्या येथे आल्या होत्या. कॅप्टन आणि अरुसाची मैत्री कायम राहिली.
2006 मध्येच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अरुसा यांच्या व्हिसासाठी विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी अनेकदा भारताला भेट दिली
2010 मध्ये अमरिंदर सिंग यांच्या ‘द लास्ट सनसेट’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अरुसाही भारतात आल्या होत्या.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here