भारत पराभूत झाल्यावर केली पाकिस्तानला पाठिंबा देणारी घोषणाबाजी

India vs Pakistan, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून मोठा पराभव केला. वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताने पहिल्यांदा पाकिस्तानकडून हार पत्करली. या पराभवानंतर पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या काही लोकांविरोधात जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी थेट प्राथमिक माहितीचा अहवाल म्हणजे एफआयआर दाखल केल्याची घटना घडली आहे. कायद्याचा भंग करत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

हे देखील वाचा: T20 WC: शहजादचा ‘सुपरकॅच’! चेंडू पाहताच हवेत घेतली उडी अन्..

भारत-वि-पाक-बाबर-आझम-विराट-कोहली

हे देखील वाचा: T20 World Cup:…तर भारतीय संघाचा डाव अर्ध्यावर मोडणार?

भारतीय संघाचा टी२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून दणदणीत पराभव केला. पाकिस्तानच्या संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत आजपर्यंत १२ वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ला होता. मात्र रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने या सर्व पराभवांची सव्याज परतफेड केली. पाकिस्तानने भारताला पराभूत केल्यानंतर श्रीनगरच्या SKIMS वैद्यकीय महाविद्यालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी पाकच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यामुळे अशा दोन विद्यार्थ्यांविरूद्ध एफआयएर दाखल करण्यात आल्याचे जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून सांगण्यात आले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here