दिवाळीला अवघा आठवडा उरला आहे. सगळ्यांच्या घरी तयारीची लगबग सुरू झाली असेल. . हा सण आपल्या प्रिय व्यक्तींबरोबर साजरा करण्यात वेगळाच उत्साह असतो. त्यामुळे आपले घर प्रकाशाने उजळावे अशी इच्छा प्रत्येकाचीच असेल. दिवाळी हा प्रकाशाचा सण. त्यामुळे वेगवेगळे दिवे, कंदील यांची रेलचेल बघायला मिळते. या दिवाळीत तुमचे घर उजळवून टाकण्यासाठी या काही पर्यायांचा विचार करा.

वाईन- बिअर बॉटल्सचा उपयोग- जर तुमच्या घरात रिकाम्या वाईन किंवा बिअर बॉटल असतील तर फेकून देण्याापेक्षा त्या पुन्हा वापरू शकता. फेअरी लाईट बॉटलमध्ये टाका. या बॉटल्स तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता. किंवा त्या तुमच्या गॅलरीत, गार्डनमध्ये लटकवू शकता.

जार कंदील- सध्या शेक जार किंवा डेझर्ट जार ट्रेंडमध्ये आहेत. तुम्ही मसून जारला आपल्या कौशल्याप्रमाणे सजवू शकता. त्याला रिबीन किंवा लेस लावा. त्यात एक मेणबत्ती लावू शकता. याने तुमच्या जागेचे सौंदर्य आणखी बहरेल. आणि ती जागाही प्रकाशमान होईल.

कागदी कंदील- तुम्ही ऑनलाईन साईट पाहून मंडल आणि कागदाचे कंदील करू शकता. त्या कंदिलात फेअरी लाईट लावा. किंवा एखादा दिवा लावून तुम्ही घराबाहेर तो टांगू शकता. तसेच तुम्ही कागदाचे अथवा फेब्रिकचे कंदील विकतही घेऊ शकता. त्यात तुमच्या आवडीप्रमाणे लाईट सोडता येतील.

हेही वाचा: दिवाळीची साफसफाई करताय? तर, या गोष्टी लक्षात ठेवा

हुला हूप कंदील- या दिवाळीला थोडे सर्जनशील होऊया. हूला हुप्स वापरून तुम्हाला तुमचे घर उजळवता येईल. हूला हुपभोवती गुंडाळण्यासाठी तुम्ही फेअरी लाईट वापरू शकता. हे दिवे कलात्मक पद्धतीने बनवता येतात आणि ते तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता.

विद्रोह पेटवा तुमची बागही फेअरी लाईट्स किंवा एलईडी दिवे वापरून प्रकाशमान करता येईळ. तुम्ही झाडांवर फेरी लाईट्सच्या लड्या गुंडाळून गार्डन प्रकाशमान करू शकता. तुमच्या घराच्या मागच्य़ा अंगणात झाडे असतील तर तेथेही या लाईट्सचा वापर करू शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here