हिंजवडी – आयटीनगरी परिसरात उभ्या राहिलेल्या अवैध बांधकामाविरुद्ध पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने कारवाई करण्यात आली. हिंजवडी येथील सर्वे क्रमांक २६१ मधील एकूण २८००० चौरस फूट उभारण्यात आलेली अवैध बांधकामे पाडण्यात आली. यावेळी पाच पोकलेन मशिनच्या सहाय्याने हि कामे पाडून कारवाई करण्यात आली.

या बांधकामावर कारवाई करतेवेळी पीएमआरडीएचे अधिकारी, पोलीस उपायुक्त तथा नियंत्रक निलेश अष्टेकर, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. काही दिवसांपासून वाघोली, शिरूर (कारेगाव) येथेही कारवाईचा बडगा उगारला असून यापुढील काळातही अवैध बांधकामाविरुद्धच्या कारवाईची तीव्रता वाढवली जाणार असल्याचे पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here