India vs Pakistan, T20 World Cup 2021: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. विराटने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाला १५१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण पाकिस्तानच्या सलामीवीरांनीच पाकला विजय मिळवून दिला. मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम या दोघांनीही प्रत्येकी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानविरूद्ध विराट कोहली नक्की कुठे चुकला? याबद्दल माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याने आपलं मत व्यक्त केलं.

हेही वाचा: T20 WC: शहजादचा ‘सुपरकॅच’! चेंडू पाहताच हवेत घेतली उडी अन्..

“खेळ सुरू होण्याआधी तुम्ही काहीही प्लॅन्स तयार करू शकता पण एकदा खेळ सुरू झाला की तुम्हाला शक्य तितक्या गोष्टींमध्येच पुढील योजनांची अमलबजावणी करावी लागते. काही वेळा खेळ सुरू झाल्यावर तुम्ही प्लॅन केलेल्या गोष्टी बदलतात. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने बुमराहचा योग्य वापर केला नाही. त्यामुळे जेव्हा सामना संपला त्यावेळी बुमराहची कामगिरी फारशी चांगली झाल्याचे दिसले नाही. बुमराहसारख्या खेळाडूला पहिले षटक देणं गरजेचं होतं. त्याला तिसऱ्या षटकापर्यंत थांबवून ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता”, असं जहीर म्हणाला.

झहीर खान

झहीर खान

हेही वाचा: T20 WC: भारताला हरवलं म्हणून खूप उड्या मारू नका – पाक कर्णधार

“बुमराह हा भारतीय संघाचा हुकूमी एक्का आहे. त्यामुळे अशा गोलंदाजाला कायम पहिली संधी मिळायला हवी. पाकिस्तानच्या संघाच्या पहिल्या काही विकेट्स लवकरात लवकर काढणं गरजेचं होतं. पण विराटने बुमराहला तिसऱ्या षटकापर्यंत राखून ठेवलं. त्याला पहिलं षटक दिलं असतं तर कदाचित सामन्यात थोडीशी रंगत आली असती”, असं जहीरने स्पष्ट केलं.

भारत-वि-पाक-बाबर-आझम

भारत-वि-पाक-बाबर-आझम

हेही वाचा: T20 WC: पाकची माजी कर्णधार म्हणते, “टीम इंडिया…”

“अशा छोट्या गोष्टी सामन्यात दिसून येत नाहीत पण खूप फरक पाडतात. काही वेळा तुम्ही स्वत: ठरवलेल्या प्लॅन्सनुसार खेळ सुरू ठेवता. मला विश्वास आहे की भारताचा डाव संपल्यानंतर गोलंदाजीच्या प्लॅनवर नक्कीच चर्चा झाली असेल. पण त्या चर्चेअंती बुमराहला पहिलं षटक द्यावं असं ठरलं नाही, त्यामुळे विराटने तसं केलं. कारण कोणालाही अशी कल्पना नव्हती की दोन सलामीवीर दीडशतकी आव्हान सहज पेलतील”, असं जहीर खानने नमूद केलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here