अवघ्या काही दिवसांवर दिपावली सण येऊन ठेपला आहे. परिसरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. विविध आकाराचे, रंगाचे आकाशदिवे बाजारात दाखल झाले आहेत. अनेक आकाराच्या, रंगांच्या पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. घराच्या सजावटीसाठी लगबग सुरु आहे. गृहीणींकडून फराळाची जोरदार तयारी सुरु आहे. पाच दिवसांच्या या सणाला रांगोळीचे महत्वही तितकेच आहे. या दिवसांत वेगवेगळ्या आकाराच्या अनेक रांगोळी तुम्ही काढता. त्याचे फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मिडियाही गजबजतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या रांगोळीच्या डिजाईन्स सांगणार आहोत. ज्या तुम्ही अगदी कमीत कमी वेळात काढू शकता. देव्हारा, तुळस, दरवाज्याजवळ, अंगणात सहज या लहान आकाराच्या रांगोळ्यांनी घरातील वातावरण प्रसन्न करु शकता.

रांगोळी चक्राचा वापर

घरातील कोणत्याही कोपऱ्यात हा आकार ठेवून तुम्ही रांगोळी काढू शकता. हे दोन अर्धवर्तुळांमध्ये किंवा चार भागांमध्ये विभागलेले असते. तुम्हाला रांगोळीचे काही किचकट आकार जमत नसतील तर तुम्ही या आकारांचा वापर करु शकता. या साच्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि कमीत कमी वेळेत एक उत्तम रांगोळी डिझाईन तुम्ही काढू शकता.

हेही वाचा: Diwali Festival : हलवाई पद्धतीचे बुंदी लाडू; जाणून घ्या रेसिपी

प्लॅस्टिकचे रांगोळी आकारातील साचे –

यामध्ये प्रत्येक आकाराच्या ६ नगांचा तयार साचा येतो. यामध्ये प्रत्येक साचा हा प्लॅस्टिकचा बनलेला असतो. यामधून रांगोळी सहज खाली उतरण्यासाठी छिद्र असतात. एका जागी ठेवून अंगठा किंवा दोन्ही बाजूच्या चिकट टेपने चिकटवून तुम्ही यामध्ये रंग भरण्याची प्रक्रीया पूर्ण करु शकता. यामुळे तुम्हाला हव्या त्या आकारात आणि डिझाईनमध्ये तुमची रांगोळी उठावदार दिसेल.

तयार आकाराचे रांगोळी साचे

जर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे रांगोळी साचे महत्वाचे आहेत. जर तुमच्या दारात तुम्ही बॉर्डरची रांगोळी काढणार असाल, तर एका साच्याच्या आकाराने तुम्ही ही रांगोळी काढू शकता. यात आवडीनुसार रंग भरू शकता. याचा एक रेखीव नमुना म्हणून तुम्ही वापरू शकता. तुम्ही तयार आकाराचे रांगोळी साच्याचा वापर करुन अनेक डिझाईन तयार करु शकता.

हेही वाचा: Diwali Festival 2021 : घरीच करा टेस्टी लसूण शेव

मजल्यावरील सजावटीसाठी रांगोळीचे प्लास्टिक साचे

दिवाळीत आणि इतर सणासुदीच्या काळात फरशीची किंवा अंगणाची सजावट करणे गरजेचे आहे. मग यासाठी रंगीत रांगोळी असो किंवा मग फुलांची रांगोळी अंगण सजणे आणि उठावदार दिसणे आवश्यक आहे. यावेळी तुम्ही रांगोळींच्या विविध आकारातील आणि पणतीच्या आकारातील साचे वापरू शकता. या आकारामुळे दारी प्रज्वलित दिव्यांचा, सकारात्मकतेचा आनंद जाणवू शकतो. त्यामुळे सजावटीसाठी तुमच्याकडे हा पर्याय असू शकतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here