प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा आज वाढदिवस,यावर्षी त्या 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1952 साली झाला. त्यांचे लग्न संगीतकार अरुण पौडवाल यांच्यासोबत झाले होते.


1973 साली आलेल्या अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी प्रमुथ भूमिका केलेल्या अभिमान या चित्रपटापासून अनुराधा यांनी आपल्या सांगितिक करिअरची सुरूवात केली. मात्र 1976 साली प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या कालीचरण चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

त्यांची तुलना लता मंगेशकर यांच्याशी केली जाऊ लागली होती. त्याकाळात लता मंगेशकर खूपच लोकप्रिय गायिका होत्या. गुलशन कुमार यांना अनुराधा यांचा आवाज लता मंगशेकर यांच्यासारखा वाटायचा. त्यामुळे त्यांनी आपण फक्त टी सिरिजसाठी गायचं असा निर्णय घेतला.

त्यांची चांगली जोडी जमली ती कुमार सानू आणि उदीत नारायण यांच्याबरोबर. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. याशिवाय सोनु निगम बरोबर त्यांनी अनेक गाणी गायली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी आणि जयदेव यासारख्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे

पार्श्वगायिका म्हणून अनुराधा पौडवाल यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. 1990 साली आलेल्या आशिकी चित्रपटातील “नजर के सामने जिगर के पास” आणि दिल है के मानता नही या चित्रपटातील गाण्यांनी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.


1991 साली पती अरूण पौडवाल यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला होता. आदित्य आणि कविता या त्यांच्या दोन्ही मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र गेल्यावर्षी मुलगा आदित्यचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर आघात झाला. त्यांची मुलगी कविता ही गायिका आहे.
Esakal