अमृता विश्व विद्यापीठ हे केरळ, तामिळनाडु, कर्नाटक या तीन राज्यांसह ६ कॅम्पसमध्ये शिक्षण देण्याचं काम करते. यात १० विभाग असून १८० हून अधिक अभ्यासक्रम शिकवले जातात. २००३ मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठाला नॅकने A++ मानांकन दिले आहे. कमी वेळेत अमृता विश्व विद्यापीठाने हे मानांकन मिळवले. भारतानेसुद्धा जागतिक दर्जाची संस्था म्हणून विकसित करण्यासाठी अमृता विद्यापीठाची निवड केली आहे. अमृता विद्यापीठाला जगातील ३०० विद्यापीठांमध्ये स्थान देण्यात आले आहे. NIRF रँकिंगमध्ये भारतातील आघाडीच्या ५ विद्यापीठांमध्ये अमृता विद्यापीठाचा समावेश आहे.
अमृता विद्यापीठाकडून इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. २८ ऑक्टोबर ते १९ डिसेंबर या कालावधीत ८ वेबिनार होणार आहेत. दिनेश कुडचे, अतिश पतंगे, प्रशांत गिरभाने, भुषण केळकर, निखिल मिजार, राजेंद्र कोपे, प्रकाश मेढेकर, सुनिल देव हे विविध विषयांर मार्गदर्शन करतील.
इंजिनअंरिगमध्ये करिअर्सच्या संधी, भविष्यात येणारे तंत्रज्ञान, करिअरमध्ये काय बदल होतील, एज कम्प्युटिंग, ई मोबिलिटी, फाइव्ह जी आल्यास काय परिणाम होईल? थ्री डी प्रिंटरच्या सहाय्याने बांधकाम, आरोग्य क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची भूमिका या विषयांचा वेबिनारमध्ये उहापोह करण्यात येईल. वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक करा

बदलत्या काळानुसार आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाचा समावेश अमृता विद्यापीठाने केला आहे. इंजिनिअरिंगमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानासह भविष्यातील गरजेनुसार शिक्षण दिले जात आहे. तसंच विद्यार्थ्यांना वेबिनारच्या माध्यमातून नवनव्या ट्रेंडनुसार आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सक्षम केलं जात आहे.
वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे आवडते क्षेत्र निवडण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी पदवीपूर्व अभ्यासक्रम कोणते? करिअरच्या संधी कोणत्या क्षेत्रात आणि किती आहेत याची माहिती देण्यात येईल.
धकाधकीच्या आयुष्याल सुखकर करण्यासाठी आपल्या शिक्षणाचा कसा वापर करता येईल यादृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. या नव्या कोर्सबाबत माहिती देण्यासह प्रत्यक्षात जगात आपल्या शिक्षणाचा आणि नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालणे, करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
सेशन कशासाठी?
गेल्या दोन वर्षांपासून +2 विद्यार्थ्यांसाठी फिजिकल कोर्सेस घेण्यात आले नव्हते. आता फाउंडेशन प्रोग्रॅम +2 प्रोग्रॅम सुरु करून इंजिनअरिंगमध्ये कोणताही खंड न पाडण्यासाठीचा प्रयत्न आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे बेसिक पक्के करणे हा उद्देश आहे. भविष्यातील तंत्रज्ञान आणि वास्तव जग यांचा समन्वय साधण्याचं काम हे वैज्ञानिक आणि तांत्रिक कल्पनांच्या सहाय्याने करण्यासाठी मार्गदर्शन केलं जाईल. कंम्प्युटर इंजिनिअरिंगशिवाय इतर विषयांशी ओळख नसलेल्यांना याची माहिती देणे आणि करिअरचा योग्य आणि सर्वोत्तम असा मार्ग निवडण्यासाठी मदत करणे हे अमृता विद्यापीठाचं उद्दिष्ट आहे. इंजिनिअरिंगच्या बॅचलर प्रवेशाआधी इतर अडचणींची त्यांना माहिती देणं महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे इतर शक्यता आणि नोकरीच्या संधी यांची कल्पना विद्यार्थ्यांना असायला हवी. त्यांच्यासाठी कोणतं करिअऱ बेस्ट हे ठरवायला यामुळे मदत होईलच. पण त्यासोबत उद्याच्या भावी इंजिनिअरला त्याच्या विकासासाठी मदतसुद्धा होईल.
Esakal