मुंबई – आपल्या अभियनयानं ज्या अभिनेत्यानं साऱ्या देशातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले तो अभिनेता आजही तितक्याच उत्साहानं कार्यरत आहे. त्याचा अभिनय पाहणं हे त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. 80 च्या दशकापासून त्या अभिनेत्यानं आपल्या अभिनयाचे गारुड प्रेक्षकांच्या मनावर केले ते अजूनही कायम आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे, भूमिकेमुळे आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांमुळे त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. मात्र हे अभिनेते आणि त्यांची लोकप्रियता अद्याप कायम आहे. त्याचे कारण त्यांचा अभिनय आणि त्या नावामागे असलेलं वलय.






अभिनेता कमल हासन यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तो त्यांचा लहानपणीचा फोटो आहे.
Esakal