दिवाळी जवळ आली की नवी साडी घेणे हे ठरलेलेच. यावेळी ठेवणीतल्या साड्याही बाहेर काढल्या जातात. त्यांना उन दाखवले जाते. अगदी गरज असेल तर ड्रायक्लिकनही केल्या जातात. साडी नेसल्यावर त्याला परफेक्ट लूक द्यायचा असेल तर दागिन्यांशिवाय पर्याय नाही. त्यात पारंपारिक दागिनेही छान दिसू शकतात. मात्र त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

चोकर ट्राय करा – ट्रेडीशनल लूक हवा असेल तर लांब गळयातलं एकदम मस्त दिसेल.पण ट्रेण्डी लूक हवा असेल तर, सिल्कचा साडीवर तुम्ही चोकर घालण्य़ाचा विचार करा. अगदी बारीक चोकर उठून दिसणार नाही त्यामुळे चोकर ब्रॉड असेल तर तो तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे उठून दिसेल. त्यामुळे तुम्ही ट्रेडिशनल कपड्यातही एकदम उठून दिसाल. गळाबंद चोकर असेल तर मोठे कानातले घालणं टाळा. त्यापेक्षा छोटे कानातले वापरा.

लांब कानातले मस्ट- काही सिल्कच्या साड्यांचे काठ मोठे असतात. त्यांच्यावर गळ्यातलं फारसं शोभून दिसत नाही. अशावेळी मोठे कानातले घालायचा विचार करा. आजकाल साडीवर शोभून दिसतील असे मोठे लोंबकळणारे कानातल्याच्या खूप व्हरायटीज मिळतात. अशाप्रकारे तुम्ही तुमचा लूक कंप्लिट करू शकता.

स्टॅण्ड कॉलरचा पर्याय- सिल्क साडीवर स्टॅण्ड कॉलरचे ब्लाऊज उठून दिसतात. तसेच तुम्ही बंद गळ्याच्या ब्लाऊजचाही विचार करू शकता. असा ब्लाऊज वापरणार असाल तर मोठे कानातले मात्र नक्की घाला. त्याने तुमचा लूक कंप्लिट दिसेल.

स्लिव्हलेस ब्लाऊजचाही विचार करा- नेहमीपेक्षा वेगळा लूक ट्राय करायचा सेल तर सील्कच्या साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज घालून दुम्ही एकदम ट्रेंण्डी दिसू शकता. आजकाल साडीवर मॅच होतील असे रेडिमेड स्लिव्हलेस ब्लाऊज बाजारात मिळतात.
Esakal