सणवार म्हटलं की घराची साफसफाई, सजावट ही करावीच लागते. सध्या दिवाळीमुळे घरोघरी सजावटीची तयारी सुरु झाली असेल. सजावट करताना पारंपरिक पध्दतीने दाराला तोरण बांधून, दारात रांगोळी काढून, अंगणात दिवे आणि आकशकंदिल लावले जातात. घरात कोणतही शुभकार्य किंवा मंगलकार्य असेल, तसेच सण-सुद असेल तर दाराला तोरण बांधले जाते. घरा-दारावर तोरण बांधून पाहुण्यांचे स्वागत करण्याची परंपरा अगदी पुरातन काळापासून चालत आली आहे. झेंडूची फुलं आणि आंब्याच्या डहाळ्यापासून बनवलेले तोरण दाराला लावले जाते.
बदलत्या काळानुसार आता पारंपरिक झेंडू-डहाळीच्या तोरणाची जागा आधूनिक आर्टिफिशअल तोरणांनी घेतली आहे. झेंडू-डहाळीसारखे हूबेहूब दिसणारे प्लास्टिकच्या फुलांचे आर्टिफिअशल तोरण सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही पारंपारिक तोरण वापरू शकताच पण तुम्हाला त्यासाठी काही पर्याय हवे असल्यास तुम्हाला अशाच काही आर्टिफिअशल तोरणांच्या प्रकाराबाबत आम्ही माहिती देणार आहोत.

आर्टिफिशअल झेंडूच्या पुलांचे तोरण :
तुम्हाला फक्त झेंडुच्या फुलांपासून बनवलेले केसरी किंवा पिवळ्या रंगाचे तोरण बाजारात सहज मिळतील. तुम्ही असे तोरण दाराला लावू शकता ज्यामुळे तुमच्या दरवाजाची शोभा देखील वाढेल. हे तोरण 99 टक्के खऱ्या झेंडुच्या फुलांसारखेच दिसते.

झेंडुचे फुल आणि आंब्याचे तोरण
झेंडुचे फुल आणि आंब्याची पानांचे तोरण बांधण्याचे पारंपारिक पध्दत आहे. तुम्हाला आर्टिफिशअल तोरण बांधूनही हा पांरपारिक लूक मेनटेन करता येतो. झेंडुचे फुल आणि आंब्याची पानांचे तोरणसारखे हूबेहुब दिसणारे तोरण तुम्हाला बाजारात मिळू शकते.

विविध फुलांचे तोरण
तुम्हाला दिर्घकाळ टिकाणारे तोरण हवे असल्यास तुम्ही रंगीबेरंगी फुलांचे आर्टिफिशअल तोरण वापरू शकता. त्यामुळे यामध्ये विविध प्रकारचे ऑपशन मिळतात. पिंक, व्हाईट किंवा लाल रंगाच्या फुलांचे तोरण तुम्हाला मिळतील.
Esakal