गुजरामधील पहिले विमान रेस्टॉरंट सोमवारी नागरिकांसाठी खुले करण्यात आले. वडोदरा शहरातील तरसाली बायपास परिसरात हे रेस्टॉरंट आहे.

भंगार विमानाचा वापर करुन याचे रुपडे पालटवण्यात आले
आहे. भारतातील चौथे तर जगातील नववे विमान थीम असलेले हे रेस्टॉरंट आहे.

बंगळुरूमधील एका कंपनीकडून १.४० कोटी रुपयांना एअरबस 320 या विमानाची खरेदी करण्यात आली. त्यानंतर विमानाचा प्रत्येक सुटा भाग वडोदऱ्यात आणून त्यांची बांधणी करण्यात आली.

आता या रेस्टॉरंट विमानाची किंमत २ कोटी झाली असून, एकावेळी येथे १२० नागरिक बसण्याची आसन क्षमता आहे.

येथील वेटर हे एअर होस्टेस सारखे कपडे घालतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष विमानात बसल्याचा अनुभव मिळेल.

तसेच, या रेस्टॉरंटमध्ये तुमच्या कडे पंजाबी, चायनीज, इटालियन, मेक्सिकन अशा डिशेल खाण्यासाठी मिळतील.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here