सिंगापूर हे भारतीयांच्या आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. अनेक लोक कुटुंबासह सुट्टी एन्जाॅय करण्यासाठी इथं येतात, तर काहीजण हनिमूनसाठीही ही जागा निवडतात.

गार्डन्स बाय द वे : सिंगापूरला गार्डन्सचे शहर म्हणूनही ओळखले जातं. सिंगापूर बाॅटनिक गार्डन आणि गार्डन्स बाय द वे ही येथील जागतिक दर्जाची आकर्षणं आहेत. विशेषत: तुम्ही हनिमूनला जात असाल, तर तुम्ही ‘गार्डन्स बाय द वे’ला जरूर भेट द्या. प्री-वेडिंग शूटसाठीही लोक इथं येतात.
चांगी पॉइंट कोस्टल वॉक : चांगी पॉइंट हे हनिमून कपल्ससाठी सिंगापूरमधील सर्वात रोमँटिक ठिकाण एक आहे. समुद्र, किलॉन्ग आणि बोटींच्या विलोभनीय दृश्यांमध्ये आपल्या जोडीदारासोबत बीचवर फिरायला कोणाला आवडणार नाही. त्यामुळं या ठिकाणाला जरुर भेट द्या.
हाजी लेन : जर तुम्हाला सिंगापूरमध्ये उत्तम खरेदीचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही हाजी लेनला भेट दिलीच पाहिजे. तुम्ही येथील प्रसिद्ध डिझायनर बुटिक्समधून स्वतःसाठी सर्वोत्तम कपडे आणि उपकरणे खरेदी करू शकता.
सिंगापूर नदीत क्रूझ राइड : तुम्हाला हे अद्भुत शहर जवळून पाहायचं असेल, तर तुम्ही सिंगापूर नदीवर जायला हवं. इथला नजारा आपलं मन प्रसन्न करुन सोडेल.
बुकिट मीटिंग टाउन पार्क : हे पार्क जोडप्यांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. इथलं निसर्गसौंदर्य, सुंदर जंगल आणि लँडस्केपमध्ये तुम्ही हरवून जाल. लग्नाचे फोटोशूट आणि हनिमूनसाठीही हे एक उत्तम ठिकाण आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here