बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी ही एक उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना आणि गायिका आहे. तिने हिंदीसोबतच तेलेगु, तमिळ आणि मल्याळम या भाषेत काम केलं आहे. अदितीने ‘प्रजापति’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

अदितीचा जन्म हैद्राबादमध्ये झाला असून, ती दोन वर्षांची असतानाच तिचे पालक विभक्त झाले होते. तिची आई हैदराबादहून नवी दिल्लीत आली आणि तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं.
खूप कमी लोकांना माहिती आहे की, आदिती राजा-महाराजांच्या घराण्यातील आहे.
एका मुलाखतीमध्ये आदितीने सांगितलं होतं, ” मी माझ्या पालकांची म्हणजेच दोघांचीही आडनावं वापरते. कारण माझ्या आईने मला वाढवलं आहे आणि माझे वडील माझ्या आयुष्यातील एक भाग आहे. म्हणून मी राव आणि हैदरी हे दोन्ही आडनाव वापरते .
अदिती वयाच्या १७ व्या वर्षी सत्यदीपला भेटली होती. नंतर २००९ मध्ये अदितीने अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न केलं.
२०१२ च्या मुलाखतीत तिने तिच्या वैवाहिक जीवनावर भाष्य करण्यास नकार दिला होता. पण २०१३ च्या मुलाखतीत तिने त्यांचा घटस्फोट झाल्याचा उल्लेख केला होता.
वयाच्या २१ व्या वर्षी तिने त्याच्याशी लग्न केलं पण हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना तिने लग्न लपवून ठेवलं होतं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here