दिवाळी असो किंवा कुठलाही सण. महिला साड्या हमखास नेसतात. काहींना आवड म्हणून तर काही सणाला साडी नेसावीच हा दृष्टिकोन बाळगून. अर्थात सिल्कच्या साड्या या निमित्ताने नेसल्या जातात पण पुरूषांचा मात्र झब्बा लेगा किंवा कुरता ठरलेलाच. ते थोडीच साडी नेसणार.पण या दिवाळीत तुम्ही जरा वेगळा विचार करून साडी नेसू शकता. तुम्हाला आवठतय का, रणवीर सिंगनेही अशाप्रकारे साडी नेसली होती. ती चांगलीच व्हायरल झाली होती. तशीच साडी नेसली पाहिजे असं काही नाही. पण एक व्हिडिओ व्हायरल झालाय तो पाहून तुम्ही या दिवाळीत तशाप्रकारे साडी नेसण्याचा नक्की प्रयत्न करा. यानिमित्ताने एक वेगळी फॅशन करता येईल.
बायांनो, साड्या लपवून ठेवा. पुरूषांसाठीपण साडी फॅशन झाली आहे, असं कॅप्शन देत तुफान या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हि़डिओत आकाशी, गुलाबी रंगाचा कु़डता घातलेल्या एक तरूणाच्या हातात ऑफ व्हाईट साडी आहे. साडीच्या अत्यंत नजाकतीने तो निऱ्या करत आहे. तर दुसरी साडी गुलाबी रंगाची आहे. काष्टा साडी नेसल्याप्रमाणे ती साडी त्याने नेसली असून त्याचा पदर खांद्यावर घेतला आहे. त्याच्या गेटअपवर ही साडी अत्यंत सूट होत असून ती फारच सफाईदारपणे नेसली आहे. या गेटअपवर त्याने डार्क ब्राऊन रंगाची मोजडी घातली आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अकरा हजारांपेक्षा जास्त लोकांनी तो लाईक केला आहे. काहींना या तरूणाने केलेल्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी टीका करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. एकूमच हा व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे. पण, एक वेगळेपणा म्हणून याकडे पाहून या दिवाळीला अशी फॅशन करण्याचा प्रयत्न करा.
Esakal