क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या Aryan Khan जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने बुधवारी तहकूब केली. याप्रकरणी आज, गुरुवारीही सुनावणी होणार आहे. आरोपींना अटक करण्यापूर्वी अटकेची कारणं तपास यंत्रणेकडून सांगणं अपेक्षित होतं. मात्र, योग्य कारण न देताच अटक करून केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केल्याचा दावा आर्यनसह तिघांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. याप्रकरणी पुन्हा एकदा अभिनेता हृतिक रोशननचे Hrithik Roshan त्याचं मत मांडलं आहे. याआधीही हृतिकने आर्यनसाठी भलीमोठी पोस्ट लिहिली होती.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हृतिकने एका प्रसिद्ध पत्रकाराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पत्रकार फाये डिसूझाने सर्वोच्च न्यायालयाचे वकील दुष्यंत दवे यांची मुलाखत शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी या खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती नितीम सांबरे यांनी यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्यांना जामीन कसा मंजूर केला, याचा उल्लेख करत या प्रकरणावर आपलं मत मांडलं. हाच व्हिडिओ शेअर करत हृतिकने लिहिलं की, “जर यात तथ्य असेल तर, हे खरोखरंच दुःखद आहे.”

हेही वाचा: ‘मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवण्यापेक्षा..’; समंथाचा पालकांना मोलाचा सल्ला

हृतिकने याआधी एक पोस्ट लिहित आर्यनला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. ‘मी तुला लहानपणापासून ओळखतो. जे काही तू अनुभवतोय, त्या सर्वांचा स्वीकार कर. शांत रहा, निरीक्षण करत रहा. टॉमला घडवण्यासाठी हे क्षण महत्त्वाचे आहेत आणि टॉम पुन्हा एकदा सूर्यासारखा चमकणार आहे. पण त्यासाठी तुला आधी अंधारातून जावं लागेल’, अशी पोस्ट हृतिकने लिहिली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here