प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आता काम बंद आंदोलन पुकारले आहे. आगारात सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करत एकत्र आले. अचानकपणे पुकारलेल्या या आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. गुरुवारी सकाळी मुख्य बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली असून बसेस आगाराच्या आवारात लावून आहेत. आंदोलनामुळे इचलकरंजी आगाराच्या 254 बसफेऱ्यां जागीच थांबल्याने 23 हजार किलोमीटरचा प्रवास ठप्प झाला आहे.








दरम्यान कर्मचाऱ्यांनी तीन टक्के वेतनवाढ, घरभाडे, शासन कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे मिळावे. 28 टक्के महागाई भत्ता मिळावा, एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे, नियमित वेतन मिळावे, दिवाळी बोनस पंधरा हजार रुपये प्रमाणे मिळावा आणि शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वेळेत पगार मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन केले आहे.
Esakal