मुंबई – कोरोनाचा प्रभाव ओसरु लागल्यानंतर मनोरंजन क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही सेलिब्रेटींनी त्यांचे गेल्या वर्षी राहिलेले सेलिब्रेशन पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी अनेकांचे विवाह कोरोना काळात झाल्याचे दिसून आले आहे. आता बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असणारे कपल्स म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलीय. या दोन्ही सेलिब्रेटींना त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कतरिनानं गुपचूप साखरपूडा उरकल्याची चर्चा होती. मात्र आता विकी कौशलनं आपण लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली आहे.

विकीनं आपल्या विवाहस्थळाची माहितीही दिली आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग हे राजस्थानातील एका शेकडो वर्षापूर्वीच्या राजवाड्यात होणार आहे. सध्याचे त्याचे फोटो व्हायरल झाले असून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या डिसेंबरमध्ये कतरिना आणि विकी कौशलचे लग्न होणार आहे. मात्र दुसरीकडे या दोन्ही सेलिब्रेटींनी याविषयी जे काही बोललं जात आहे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत की, त्यामुळे त्यांचे लग्न पुढच्या महिन्यात होणार असल्याच्या बातम्यांना पुष्टी मिळाली आहे. त्यांनी त्यांच्या लग्नाची तयारीही सुरु केली आहे. दुसरीकडे त्यांच्या लग्नाचे ठिकाणही ठरल्याचे सांगण्यात आले आहे.
राजस्थानातील सवाई माधेपूरमध्ये असणाऱ्या एका बड्या हॉटेलमध्ये विकी कौशल आणि कतरिनाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. यापूर्वी भलेही विकी आणि कतरिनानं त्यांच्या लग्नाविषयी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली असेल पण त्यांच्या कुटूंबियांकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. विकी कौशलचा गेल्या आठवड्यात सरदार उधम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यानं त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेस आपल्या साखरपुड्याविषयी सांगितले होते.
हेही वाचा: ‘आमचं ठरलं’! ; विकी कॅटरिनाची शॉपिंगला सुरुवात
हेही वाचा: विकी कौशलच्या पाठीवर वार, इन्स्टाग्रावर फोटो शेअर
Esakal