मुंबई – टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेणार अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं दोन सप्टेंबरला निधन झाले. त्याच्या अचानक जाण्यानं मनोरंजन विश्वाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. बॉलीवूडच्या दिग्गज सेलिब्रेटींनी सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली होती. यासगळ्यात त्याची मैत्रीण शहनाज गिलला मोठा मानसिक धक्का बसला होता. ती आता त्या धक्क्यातून सावरताना दिसत आहे. दरम्यान सिद्धार्थच्या जाण्यानंतर तिनं पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याची सध्या चर्चा आहे. तिच्या त्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या भूमिकेनं सिद्धार्थनं चाहत्यांना आपलेसे केले होते. त्याच्या जाण्यानं चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. बिग बॉसचा विजेता म्हणून लोकप्रिय झालेल्या सिद्धार्थनं अमाप लोकप्रियता मिळवली होती. त्यानं अनेक रियॅलिटी शो मध्ये देखील काम केले होते. बिग बॉसच्या शो मध्ये त्याची आणि शहनाज गिलची वेगळी केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. काही दिवसांपूर्वी शहनाज गिल तिचा मित्र दिलजीत दोसांज सोबत तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसून आली होती. काही वेळापूर्वी शहनाजनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिनं सांगितलं आहे की, आपण एक गाणं रिलीज करणार आहोत. ते गाणं तिचा दिवंगत मित्र सिद्धार्थ शुक्ला याच्यासाठी असणार आहे.

सिद्धार्थच्या जाण्यानंतर शहनाजची ही पहिली पोस्ट आहे. बिग बॉसचा 13 वा सीझन ज्यावेळी संपला त्यानंतर शहनाजनं आपल्या प्रेमाची जाहीर कबूली दिली होती. त्यानंतर तिला आणि सिद्धार्थला सिडनाज या नावानं ओळखलं जात होतं. ते या नावानं सोशल मीडियावर लोकप्रियही झाले. मात्र काळानं सिद्धार्थवर घाला घातला. त्याचं दोन सप्टेंबर रोजी हदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिद्धार्थ गेल्यानंतर शहनाजला मोठा धक्का बसला होता. तिनं काही दिवस अन्नपाणी वर्ज्य केलं होतं.
हेही वाचा: सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पहिल्यांदाच व्यक्त, “एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा..”
हेही वाचा: सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त कळताच शहनाज गिलने सोडलं शूटिंग
Esakal