
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरानं नुकताच तिचा 48 वा वाढदिवस साजरा केला. प्रियकर अर्जुन कपूरनं (Arjun Kapoor) त्याच्या घरी एक भव्य पार्टी आयोजित केली होती.

वाढदिवसाच्या तीन दिवसांनंतर, मलायका पुन्हा एकदा तिच्या पूर्वीच्या रुटीनमध्ये परतताना दिसली. ती बोल्ड अंदाजामध्ये मुंबईतील वांद्रेत एका सलूनबाहेर पहायला मिळाली.

मलायकानं बोल्ड दिसणाऱ्या टॉपसह मिड वेस्ट रिप्ड जीन्स घातली होती. त्यात ती अधिकच स्मार्ट दिसत होती.

या सुंदर लूकसह मलायकानं Gucci लेटेस्ट हँडबॅग कॅरी केली होती, ज्यावर अल्फाबेटिकल प्रिंट होतं. यावेळी तिनं तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप केलेला नव्हता.

मलायका तिच्या बॉडीला सूट होतील, असेच कपडे खरेदी करत असते. तिचा फॅशनेबल कपडे खरेदीवर अधिक भर असतो.
Esakal