मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ‘माझा होशील ना’ फेम विराजस कुलकर्णीला ती डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. पाहुयात शिवानी खास फोटो…

गेल्या काही महिन्यांपासून विराजस आणि शिवानी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
२०२० मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी शिवानीने ‘Yup ‘असं कॅप्शन देत विराजस सोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. आणि तेव्हापासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
शिवानी आणि विराजस यांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली. ‘डावीकडून चौथी बिल्डींग’ या विराजसच्या प्रायोगिक नाटकात शिवानीने काम केलं होतं.
शिवानी आणि विराजस नेहमीच एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
शिवानीने अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे
शिवानीने २०१३ मध्ये ‘चिंटू २: खजिन्याची चित्तरकथा’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here