शाही घराण्यातील महिलांबाबत जपानमध्ये एक नियम आहे, ज्यामध्ये महिला राजेशाही परिवार सोडून इतर सामान्य व्यक्तीसोबत लग्न करणार असेल तर त्या महिलेला शाही थाट सोडवा लागतो.

बॉयफ्रेंड सोबत लग्न करण्यासाठी आपला शाही थाट सोडून आलेली जपानची राजकन्या पती केई कोमुरो सोबत अमेरिकेत राहणार आहे.
जपानच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार राजकुमारी माको आणि तिचा पती हे न्युयॉर्कमध्ये एका ‘वन रुम किचन’मध्ये राहणार आहेत.
सुरुवातील राजकुमारी माको हिने टोकियोतील आपला शाही बंगला सोडला आहे.
आता हे जोडपे टोकियोतील एका अपार्टमेंटमध्ये राहत आहे. यानंतर ते अमेरिकेला स्थायिक होणार आहेत. राजकुमारी माको हिचे पती वकिली करत असून अमेरिकेतील एका कंपनीत ते काम करतात.
न्युयॉर्कमध्ये काही खास ठिकाणे आहेत, जिथे एक बेडरुमचे फ्लॅट आहेत. जे भाडेतत्वावर २.२ ते ८.२ लाख रुपयांना मिळू शकतात.
30 वर्षांची राजकुमारी माको ही क्राउन प्रिंस फुमिहितो यांची मुलगी आहे. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर २६ ऑक्टोबरला तिने केई कोमुरो सोबत लग्न केले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here