मुंबई – दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभु ही तिच्या वेगळेपणामुळे बॉलीवूडमध्ये चर्चेत आली खरी. मात्र ती वादाच्या भोवऱ्यातही सापडली. हा वाद आहे तिच्या वैवाहिक आयुष्याचा गेल्या काही दिवसांपासून समंथाला तिच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी तिला नागा चैतन्यापासून घेतलेल्या घटस्फोटाविषयी वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. मात्र त्याच्यापासून विभक्त होण्याचा तिचा निर्णय ठरलेला होता. तिला स्वताची स्पेस हवी होती. नागानं तिला काही बंधनात ठेवल्याचे तिचे म्हणणे होते. द फॅमिली मॅनमध्ये समंथानं काम करु नये अशी तिच्या कुटूंबाची इच्छा होती. तिनं आता परिवाराकडे लक्ष द्यावे असे तिला सांगण्यात आले होते. मात्र तिच्या मनात तेव्हाच शंकेची पाल चूकचुकली.

आता समंथानं आपल्या घटस्फोटीत पतीला सोशल मीडिया अकाउंटवरुन रामराम केला आहे. तिनं त्याला अनफॉलो केल्याची माहिती सोशल मीडियावरच व्हायरल झाली आहे. यापूर्वी समंथाला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल केले होते. मात्र त्यांना ती पुरुन उरली. तिनं त्यांना जशास तसे उत्तर दिले होते. सध्या तिनं अनेक पालकांना मुलीचे लग्न करताना कुठल्या गोष्टींचा प्राधान्यक्रमानं विचार करा हे सांगितलं आहे. तिची ती पोस्ट दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. समंथाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिच्याकडे काही बॉलीवूडच्या ऑफर असल्याचे सांगण्यात आले आहे.

समंथानं आपल्या इस्टांवरुन नागा चैतन्याचे सगळे फोटो डिलिट केले आहेत. त्यावरुन तिला तिच्या चाहत्यांनी काही प्रश्नही विचारले आहेत. काहींनी तिच्या या भूमिकेचे कौतूकही केले आहे. तिनं आपल्या लग्नाचे आणि ज्याठिकाणी व्हॅकेशन इंजॉय केले होते त्याठिकाणचे फोटो डिलिट केल्याचे दिसून आले आहे. समंा आणि नागा चैतन्य हे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी स्पेन, अॅमस्टर डॅम, राणा दग्गुबातीच्या लग्नालाही गेले होते. त्यावेळच्या सगळ्या आठवणी आता समंथाने डिलिट केल्या आहेत.

हेही वाचा: कठोर शर्ती घाला, पण जामीन द्या; आर्यन खानच्यावतीने विनंती

हेही वाचा: सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पहिल्यांदाच व्यक्त, “एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा..”

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here