भारताच्या संघाचा टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानशी होता. गेल्या १२ सामन्यात अजिंक्य असलेला भारत यंदा मात्र पाकिस्तानकडून दहा गड्यांनी पराभूत झाला. पराभवानंतर भारताच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित झाले. अनेकांनी हार्दिक पांड्या आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीबद्दल तसेच निवडीवर प्रश्न उपस्थित केले. तोच धागा पकडत भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी हार्दिक पांड्यावर सडकून टीका केली. तसेच, भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात काय बदल करावेत, याबद्दल सल्ला दिला.
हेही वाचा: T20 WC: खतरनाक!! नईमने कॅच घेण्यासाठी हवेत उडी घेतली अन्…

टीम-इंडिया
“जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यास सक्षम नसेल तर त्याला पहिले संघातून बाहेर हकला. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात तसंही त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्या वेदना त्याच्या चेहऱ्यावरही दिसत होत्या. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याला संघातून बाहेर काढा आणि त्याच्या जागी फॉर्मात असलेल्या इशान किशनला संधी द्या. अशा वेळी मी नक्कीच हार्दिकपेक्षा इशान किशनला प्राधान्य दिलं असते”, असे सुनील गावसकर म्हणाले.
हेही वाचा: T20 WC: एका सामन्यात बाहेर; आता क्विंटन डी कॉकचा मोठा निर्णय
“संघ निवडीबद्दल बोलायचं झालं तर मी असं सूचवेन की शार्दूल ठाकूरचाही संघात विचार व्हायला हवा. भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दूल ठाकूरला संघात स्थान देणं शक्य आहे. भुवीची कामगिरी पाहता शार्दूल त्याच्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे असं मला वाटतं. पण एका सामन्यानंतर भरपूर बदल करणंही चुकीचं ठरेल. कारण तसं झाल्यास प्रतिस्पर्धी संघाला असं वाटू शकतं की तुम्ही संघ म्हणून थोडेसे गोंधळलेले आहात. त्यामुळे नीट विचार करून निर्णय घ्या.

सुनील-गावस्कर-टीम-भारत
हेही वाचा: T20 WC: पहिल्याच षटकात ट्रंपलमनने घेतल्या ३ विकेट्स (Video)
दरम्यान, हार्दिक पांड्याची टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर IPL चा युएईतील हंगाम रंगला होता. त्या हंगामात त्याला गोलंदाजी करता आली नव्हती. अशा वेळी त्याला संघात का निवडलं, असा सवाल फॅन्सकडून विचारण्यात येत होता. त्यानंतर पाकिस्तानविरूद्ध त्याला संघातही घेण्यात आले. पण त्याला ८ चेंडूत केवळ ११ धावा करता आल्या. त्यानंतर तो मोठा फटका खेळताना बाद झाला.
Esakal