स्त्री पुरूष संबंधावेळी गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम वापरणे फायद्याचे ठरते. त्यासाठी स्त्री आणि पुरूषांसाठी वेगवेगळे कंडोम मिळत होते. पण युनिसेक्स कंडोम मिळायला लागले तर…
मलेशियातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी हे कंडोम तयार केले असून पुरुषांसह स्त्रियाही त्याचा वापर करू शकतात. हे कंडोम तयार करण्यासाठी मेडिकल ग्रेड साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या साहित्याचा वापर जखमेच्या ड्रेसिंगसाठी केला जातो, असे हे कंडोम तयार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले.

वॉन्डालीफ युनिसेक्स कंडोम (Wondaleaf Unisex Condom) असे या युनिसेक्स कंडोमचे नाव आहे. ‘या कंडोमच्या मदतीने लोक जन्मदरावर नियंत्रण मिळवू शकता. याशिवाय यौन सुरक्षेसाठीही ते फायद्याचे ठरेल,असे मेलिशनय कंपनी ट्विन कॅटेलिस्टचे स्त्री रोगतज्ज्ञ जॉन तांग इंग चिन यांनी सांगितले.
बाजारात हे कंडोम डिसेंबरपर्यंत मिळू शकेल. याची किंमत १४.९९ रिंगिट म्हणजेच २७१ रूपये आहे. नेहमीप्रमाणेच हे कंडोम आहे. मात्र यात चिकटणारे कव्हर आहे. हे कव्हर महिला आणि पुरूषांच्या योग्य जागी अर्थात प्रायव्हेट पार्ट्सना चिकटेल. त्यासाठी अतिरिक्त प्रोटेक्शन दिले आहे. त्यासाठी चिकटणारा जो पदार्थ आहे तो कंडोमच्या एकाच बाजूला लावला गेला आहे. त्यामुळे कंडोम दोन्ही बाजूनी वापरता येईल. कंडोमच्या एका डब्यात २ कंडोम मिळणार आहेत.
Esakal