बॉलीवूडच्या किंग खानचा शाहरुखचा येत्या दोन नोव्हेंबरला जन्मदिन आहे. त्याला त्याच्या जन्मदिनाच्या पाच दिवस अगोदरच आर्यनला मिळालेला जामीन म्हणजे मोठं गिफ्ट आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियातून समोर येत आहे. गेल्या २६ दिवसांपासून आर्यन खान हा मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये बंदिस्त आहे. त्याला उद्या किंवा परवा जेलमधून सोडण्यात येईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान साधारण एक आठवड्यांपूर्वी आर्यनच्या आईचा गौरीचा जन्मदिन होता. आर्यनचं घरात नसणं यामुळे तिनं जन्मदिन साजरा केला नाही. मात्र आता शाहरुखच्या जन्मदिनी तो घरी असणार आहे.

यंदाच्या वर्षी किंग खान त्याचा 56 वा जन्मदिन साजरा करणार आहे. त्याच्या जन्मदिनी आर्यन खान घरी असणे हेच त्याच्यासाठी मोठे गिफ्ट असणार आहे.
आर्यनला जामीन मिळता क्षणीच शाहरुखच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त केलाय. शाहरुखच्या घरी मन्नतसमोरही जल्लोष पाहायला मिळालाय.
मुंबई वरुन गोव्याला जाणाऱ्या क्रुझवरील पार्टीमध्ये अंमली पदार्थांचा वापर करण्यात आला यावरुन आर्यनला अटक करण्यात आली होती.
आता आर्यन त्याच्या परिवारासमवेत दिवाळी साजरी करणार असल्यानं शाहरुखला दिलासा मिळाला आहे. त्याच्या सुटकेसाठी शाहरुखनं देशातील सर्वोच्च वकिलांची फौज तैनात केली होती.
आर्यन खानला बॉलीवूडमधून अनेक सेलिब्रेटींचा मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळाला आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर ते आर माधवन यासारख्या मोठमोठ्या सेलिब्रेटींनी व्टिटरवरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
8 ऑक्टोबरला आर्यनच्या आईचा गौरी खानचा वाढदिवस होता. मात्र त्यावेळी आर्यन तुरुंगात असल्यानं तिला तो दिवस साजरा करता आला नाही.
गेल्या २६ दिवसांपासून आर्यन खान हा मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये बंदिस्त आहे. त्याला उद्या किंवा परवा जेलमधून सोडण्यात येईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here