IPL Retention Rules: IPL च्या १४वा हंगाम चेन्नई सुपर किंग्जने जिंकला. कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून त्यांनी विजेतेपद पटकावले. पुढच्या वर्षीपासून ही स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. याचं कारण म्हणजे IPL 2022 पासून दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद असे ते दोन संघ असणार आहेत. या संघामध्येही चांगले आणि प्रतिभावान खेळाडू असावेत यासाठी BCCI आणि IPL व्यवस्थापनाने पुढच्या वर्षाआधी मेगा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक संघ आपल्या ताफ्यातील केवळ ठराविक खेळाडूच स्वत:कडे कायम राखू शकतो. त्यानंतर उर्वरित सर्व खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होतील, असा नियम BCCI कडून लागू करण्यात आला आहे. इसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक संघाला आपल्या संघातील केवळ चार खेळाडू कायम ठेवता (IPL Retention Rules) येणार आहेत.

हेही वाचा: IPL च्या नव्या 2 टीम ठरल्या; BCCI मालामाल!

आयपीएल-लिलाव

आयपीएल-लिलाव

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक संघाला आपल्या संघातील केवळ चार खेळाडू ताफ्यात कायम ठेवता येणार आहेत. त्यातही आणखी एक अट अशी आहे की या चार खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त ३ भारतीय आणि २ विदेशी खेळाडूंना रिटेन करता येणार आहे. म्हणजेच एखादा संघ ३ भारतीय आणि १ विदेशी खेळाडू रिटेन करू शकतो. तर एखादा संघ २ भारतीय आणि २ विदेशी खेळाडू रिटेन करू शकतो. त्याशिवाय, २०१८ मध्ये महालिलाव झाला होता. त्यात असलेला राईट टू मॅच हा प्रकार यंदाच्या लिलावात नसेल असंही सांगण्यात आलं आहे. संघांना एक दिलासादायक बाब म्हणजे, या तीन भारतीय खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आणि न खेळलेले अशी कोणतीही अट नाही.

हेही वाचा: IPL New Team Bid : धोनीचे काम पाहणारी कंपनी ठरली अपात्र!

आयपीएल

आयपीएल

नव्या दोन संघांना आपल्या ताफ्यात तीन खेळाडू थेट विकत घेता येणार आहेत. त्यासाठी लिलावाची गरज नसेल. मात्र, हे खेळाडू इतर संघांना करारमुक्त केलेले खेळाडू असतील की मेगा लिलावाच्या खेळाडूंच्या यादीतील खेळाडू असतील याबद्दल अद्याप स्पष्ट कळू शकलेले नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here