नागपूर : ताणतणाव हा सध्याच्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे. परंतु, त्याला प्रयत्नपूर्वक दूर सारायला हवे. थोडा विचार केला तर त्याचे व्यवस्थापन करता येते. स्वप्रतिमा उंचावणे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आपणच आपल्याला कमी लेखू लागलो की, स्वप्रतिमा खालावते आणि नैराश्यग्रस्त होण्यास वेळ लागत नाही. यासाठी सर्व व्यक्ती आणि घटनांकडे सकारात्मकतेने पाहणे ही पहिली महत्त्वाची बाब आहे.

एखादा छंद जोपासा, वाद्य वाजविण्यास शिका, बागकाम करणे महत्त्वाचे ठरते.
दारू, सिगरेट सोडून फास्ट फूडचे प्रमाण कमी करा.
भरपूर पाणी प्या, तासभर व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या.
पाळीव प्राण्यांसोबत खेळण्यानेही तणाव कमी होते.
योग, प्राणायामाखेरीज दिवसातून किमान ३ ते ४ वेळा तरी खळखळून हसा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here