कराष्टमी म्हणजे दिवाळीची सुरुवात झाली हा संदेश देणारी पहिली पूजा असते. शेतातून ज्वारीचे पाच कणसं असलेली धांडे आणले जातात. त्याची तुळशी वृदांवनासमोर खोपडी तयार केली जाते. त्यामध्ये मातीची बोळके ठेवून त्यात धान्य भरले जाते. मधोमध आपली ग्रामदेवता व लक्ष्मीची मुर्ती ठेवुन पूजेची मांडणी केली जाते. नंतर विड्याच्या पानावर चंदन घेऊन त्यावर चंद्राची कोर काढून त्याची मनोभावे पूजा केली जाते.Team eSakal

दिवाळी
काही ठिकाणी ज्वारीच्या आंबीलचा, तर काही ठिकाणी खिर-पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. प्रांत बदलला की पूजा करायची पद्धत बदलते. काही ठिकाणी तांबे ठेवून त्यात धान्य टाकुन पूजा होते, तर काही ठिकाणी धांडे लावून पूजा होते. मात्र, दोन्हीकडे हेतू एकच असतो आपल्या गुरांढोरांप्रती आदर, धान्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. गावाकडे दूध-दुभते जनावरं भरपूर असतात. दिवाळीच्या वेळी शेतातून धन-धान्याच्या रुपात लक्ष्मी घरी आलेली असते.

दिवाळी
हेही वाचा: आली दिवाळी! ऑनलाइन शॉपिंग करताना ‘अशी’ घ्या काळजी
शेतकऱ्यांसाठी दूध-दुभते जनावरं म्हणजे धन समृध्दीच. तर पुजेला ठेवलेले धांडे आणि धान्य म्हणजेच लक्ष्मी होय. या गोष्टींची कराष्टमीला पूजा करुन दिवाळीचा पहिला नवा दिवा आज घरात लावला जातो. काही ठिकाणी आठ दिवे लावून देवीची पूजा करतात. माझी आजी सांगते, पूर्वीच्या काळी कराष्टमीपासून गुरेढोरे राखणारी गुराखी मुले संध्याकाळी दिवा घेऊन घरोघरी जायची आणि नागदिवाळीपर्यंत हा क्रम चालू राहायचा. ज्यावेळी ही मुलं दिवा घरोघरी जायची, त्यावेळी हे लोकगीत गायलं जायचं…
“दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या
लक्षीमनाच्या लक्षीमन कुणाचा
आई बापाचा…”
गाणी म्हणत मग घरातली बाई त्यांच्या हातातल्या दिव्यात तेल टाकायची आणि 25 पैसे त्यांना दिले जायचे. दिवाळी संपेपर्यंत हा दिवे मिरवायचा सोहळा चालायचा.
Esakal