दहिवडी (सातारा) : लाज मीडियाची सारी ‘मन्नत’वर विकली काय, गरिबांची पोरं उपाशी यांना कधी दिसतील काय?, असा संतप्त सवाल उपस्थित करुन एका एस. टी. कर्मचाऱ्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीय.

सध्या मीडियात विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियावर (Electronic Media) सर्वत्र एकच गोष्टीची चर्चा सुरु आहे. ती म्हणजे आर्यन खान (Aryan Khan), समीर वानखेडे (Sameer Wankhede) अन् नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याबद्दल. आर्यन खानला समीर वानखेडे ड्रग्ज पार्टीत पकडतात काय अन् नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची राळ उडवून देतात काय. हे सर्व प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तर यात राजकीय पक्ष, व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट सृष्टी सर्वचजण या ना त्या कारणाने सहभागी होतात. संपूर्ण राज्यात, देशात जणू काही हा एवढाच प्रश्न महत्वाचा आहे या पध्दतीनं चर्चा झडतात.

हेही वाचा: यासाठी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’; मलिकांनी भाजपवर केला गंभीर आरोप

पण, त्याचवेळी विविध परीक्षांमधील गोंधळाने विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय. अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडू होणार आहे. तर, एस. टी. कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी उपोषण करावं लागतंय. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या या व अशा अनेक प्रश्नांकडे सरकार, तसेच मीडियाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. आपल्याला कोणी वाली नाही, आपली कोणीच दखल घेत नाही अशी भावना निर्माण झालीय.

हेही वाचा: फक्त दोन जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात; महिला गटांत मोठी चुरस

मोहसीन अत्तार

मोहसीन अत्तार

याच भावनेला कवितेच्या रुपातून मांडलं आहे ते मोहसीन आत्तार या संवेदनशील तरुणाने, जो एस. टी. मध्ये दहिवडी डेपोत सहाय्यक कारागीर (वीज) म्हणून काम करतो. मोहसीन आत्तार (रा. मलवडी, ता. माण) हा प्रतिभावंत, गुणी कवी. उदरनिर्वाहासाठी आपली नोकरी सांभाळत सद्यस्थितीवर तो कवितेच्या माध्यमातून नेहमीच भाष्य करत असतो. त्याने लिहिलेली कविता सध्या समाज माध्यमातून सर्वत्र जोरात पसरविण्यात येत आहे.

हेही वाचा: ‘दोघेही जवळचे मित्र’; निवडणुकीत भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ देणार?

गंजाड्या आर्यसाठी मीडिया दिवानी,

वानखेडेच्या धर्मासाठी नवाब मनमानी..

काॅमनमॅनला याचा फायदा आहे का?

भाकरीचा चंद्र आपला सांगा पूर्ण होईल का?

काय करायचंय मला तुला आर्यन सुटला म्हणून?

कोकलून सांगती न्यूजवाले नशेडी जिंकला म्हणून..

लाज मीडियाची सारी ‘मन्नत’वर विकली काय?

गरीबाची पोरं उपाशी यांना कधी दिसतील काय?

कवी : मोहसीन अत्तार, आर. माळवडी, टी. माणूस

हेही वाचा: “फोटो पाठवणाऱ्याच्या इच्छेनुसार, वानखेडेंच्या लग्नाचा फोटो सार्वजनिक केला”

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here