कोणीही मनात असुरक्षिततेची भावना किंवा कमी आत्मविश्वास घेऊन जन्माला येत नाही. सततचा नकार, टीका,अपमानास्पद शब्द इ.मुळे एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दल कमीपणा वाटू लागतो. मुले देखील अशा घटनांना बळी पडू शकतात, जिथे ते आत्मसन्मान गमावतात आणि त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अशावेळी पालकांनी त्यांच्या मुलांसोबत उभे असावे आणि त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि धैर्य वाढवण्यासाठी त्यांना मदत करावी. त्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांना सुरक्षित असल्याची जाणीव करुन द्यावी. ते कितीही हट्टी आणि असह्य असली तरीही तुमच्या मुलाच्या मनातील असुरक्षितेची भावना नष्ट करण्यासाठी आणि त्यांना जीवनात अधिक आत्मविश्वास देण्यासाठी तुम्हीच मदत करू शकता. जाणून घ्या अशाच काही गोष्टी …

२. मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना का निर्माण झाली हे शोधा –
पालकांनी कोणत्याही परिस्थितीत मुलांशी संवाद साधला पाहिजे. असुरक्षित मुलांच्या बाबतीत हे अधिक महत्त्वपूर्ण बनते. जेव्हा तुम्ही मुलांशी संभाषण करता, तेव्हाच तुम्ही त्यांच्या मनातील असुरक्षिततेच्या भावनेमागील कारणं शोधू शकाल. एकदा तुम्हाला ती कळल्यावर तुम्ही त्यांना मदत करू शकता. त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढवू शकता. यातून त्यांच्या मनातील असुरक्षितता कमी करण्यासाठी विविध मार्ग शोधू शकता.
३. मुलांना स्वतःवर प्रेम करायला शिकवा
तुमच्या मुलांनी चुका केल्या तरीही त्यांना न रागावता योग्य मार्गदर्शन करा आणि त्या प्रत्येक चुकांमधून ते काय शिकू शकतात ते त्यांना सांगा. त्यांचा आत्मविश्वास वाढवा आणि स्वतःवर प्रेम करायला शिकवा. त्यांना अपराधीपणात गुंतू देऊ नका, त्यामुळे त्यांच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण होऊ शकते. स्वतःवर प्रेम कसे करावे हेही शिकवा आणि लोकांची टीका, नकारात्मक भावना आणि टिप्पण्या त्यांच्यापर्यंत येऊ देऊ नका.

४. मुलांच्या मनातील सोशल मीडिया हालचालींवर लक्ष ठेवा
डिजिटल जगाने आपल्या जीवनाचा ताबा घेतल्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या मुलाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी जबाबदार घटक असू शकतो. टीकात्मक टिप्पण्या, नकारात्मक निर्णय किंवा ट्रोलर्स यांचा मुलांवर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनात काय चालले आहे, हे तुम्हाला माहीत असावं.
५. तुम्हाला मुलांची काळजी आहे, याची जाणीव त्यांना करून द्या
चांगले पालक आपल्या मुलांना वळण लावण्यासाठी कठोर शब्द वापरत नाहीत. मायेने आणि प्रेमाने वागून आपल्या मुलांना तुम्ही आपल्या बाजूने वळवू शकता. जेव्हा एखाद्याला मुलाच्या मनात असुरक्षिततेची भावना असते, तेव्हा त्यांच्यावर टीका करणे आणि त्याच्या सर्व प्रयत्नांना दुर्लक्षित करण्यामुळे त्यांच्या मनावर अधिक वाईट परिणाम होऊ शकतो. पालकत्वाचे अनुत्पादक, क्रूर मार्ग वापरण्याऐवजी त्यांच्या प्रयत्नांना दाद देऊन त्यांना अधिक चांगले बनवा.

6. घरात एक सुरक्षित, प्रेमळ जागा तयार करा-
तुमच्या मुलाच्या मनातील असुरक्षितेतवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यासाठी घरात एक सुरक्षित, प्रेमळ जागा तयार करणे. पालक म्हणून तुम्ही ज्या आव्हानांना तोंड देत आहात, त्यांचं ओझं त्यांच्यावर लादू नका, उलट त्यांना सर्व नकारात्मक ऊर्जेपासून वाचवा. त्यांना जगाच्या वास्तविकतेची जाणीव करून देताना आणि भविष्यातील स्पर्धांसाठी त्यांना तयार करताना त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगा.
Esakal