राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका प्रतिक्रीयेला उत्तर देताना म्हटले आहेच की, अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो. पण मार्क देण्याचं काम आमच्याकडे आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर निसाणा साधला जात आहे. भाजपाचे निलेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर ट्वीटद्वारे खोचक शब्दांत टीका केली आहे.
हेही वाचा: 22 आमदार लपवलेले, यंत्रणेला वासही लागू दिला नव्हता – राणे
ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रीयेवर हसावं की रडावं ? हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. राणे म्हणतात, तुम्ही राजकारणात का आलात हाच सर्वांना प्रश्न पडतो. कारण एकही गुण नाही, म्हणून पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं आहे. त्यांना असेच लागतात. अभ्यास केला असता तर अधिवेशनात बिनधास्त आणि महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नांवर न पचकता बोलता आलं असतं, असा खोचक चिमटा त्यांनी काढला आहे.

दरम्यान, भाजपा आणि राज्य सरकारचे नेतेमंडळी यांच्यात या ना त्या ना कारणांवरून एकमेकांवर टीका सुरु असते. निलेश राणेंच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात एका नव्या वादाला तोंड फुटण्याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रीयेमुळे नेटकरींकडूनही तिखट शब्दांत प्रतिक्रीया येत आहेत.
हेही वाचा: कोकणात करेक्ट कार्यक्रम; शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत
Esakal