नागपूर : फेसबुक काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आपल्यापैकी प्रत्येकाचे खाते या सोशल मीडियावर आहे. यातून एकमेकांशी आजवर संवाद साधत होतो. डिजिटल इंडियात जस जसा बदल होत गेला तसतसा सोशल अकाऊंटमध्ये झाला. याच पावलावर पाऊल ठेवत फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरबर्ग फेसबुकचे नाव चेंज करीत ‘मेटा’ केले आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहे.


भविष्यासाठी डिजिटल परिवर्तन समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनीचे फेसबुकचे ‘मेटा’ असे नामकरण केले आहे. झुकरबर्ग त्याला ‘मेटाव्हर्स’ असे म्हणतो. पुढील दशकात मेटाव्हर्स एक अब्ज लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आशाही झुकरबर्गला आहे. हे एक नवीन व्यासपीठ असेल जे निर्मात्यांसाठी लाखो रोजगार निर्माण करेल, असे झुकरबर्गला आहे.
हेही वाचा: विठ्ठला! त्या भाविकांसाठी पंढरपूरचे दर्शन ठरले अखेरचे

दुसरीकडे फेसबुकचे नाव बदलताच लोकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ट्विटरवर मीम्स शेअर करून लोक प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर फनी मीम्सचा पूर आला आहे. ‘आयला मेटावर माझ अकाऊंट’ अस म्हणत नेटकरी खिल्ली अडवत आहे.

Esakal