29 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जागतिक स्ट्रोक दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकांना त्यांना ज्या गोष्टींची जोखीम वाटते आणि त्या जोखमीचा त्रास होण्यापासून स्वतला रोखायचे कसे याविषयी जागरूक केले जाते. गंभीर आरोग्य समस्यांमध्ये स्ट्रोक ही गंभीर समस्या आहे. तुमच्या मेंदूपर्यंत रक्त पोहोचण्यास उशीर झाला तर ही समस्या निर्माण होते. यामुळे कायमचा किंवा तात्पुरता अर्धांगवायू होऊ शकतो. जागतिक स्तरावर वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन(WSO) च्या बरोबरीने विविध संस्था त्यांच्या मोहिमांसह लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात मदत करतात. वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन ही संस्था 2006 मध्ये सुरू झाली. 2010 साली संस्थेने स्ट्रोकला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले.भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर, माजी मिस इजिप्त डालिया एल बेहेरी आणि सायकलपटू अल्बर्टो कॉन्टाडोर हे जागतिक स्ट्रोक मोहिमेचे सदिच्छा दूत आहेत.

असा आहे इतिहास-
अपंगत्वाचे सर्वात मोठे कारण हे स्ट्रोक आहे. तसेच मृत्यू होण्यासही अनेकदा स्ट्रोक जबाबदार असतो. हे जागतिक स्तरावर घडते. त्यामुळे स्ट्रोक पासून वाचण्यासाठी त्याविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे, हे ओळखून 1990च्या सुमारास स्ट्रोक डे तयार करण्याची कल्पना युरोपियन देशांच्या पुढाकाराने सुरू झाली. हा कार्यक्रम आर्थिक बाबतीत मर्यादा असल्याने फक्त युरोपपुरताच स्तिमीत होता. त्यानंतर कॅनडामध्ये 29 ऑक्टोबर 2004 साली जागतिक स्ट्रोक परिषद भरविण्यात आली. तेव्हा या दिवासाची अधिकृत स्थापना केल्याची घोषणा करण्यात आली. डॉ व्लादिमीर हाचिन्स्की यांच्या मार्गदर्शनाखाली एक गट तयार करण्यात आला. त्याच दरम्यान इंटरनेशनल स्ट्रोक सोसायटी आणि इंटरनेशनल स्ट्रोक फेडरेशन यांचे विलनीकरण झाले आणि वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन(WSO) ची स्थापना झाली.
ही आहेत लक्षणे-
– इतरांशी संवाद साधताना, त्यांचे सांगणे समजून घेताना अडचण येणे.
– हात, पाय, चेहरा सु्न्न होणे किंवा अर्धांगवायूचा झटका आल्यास.
– एक किंवा दोन्ही डोळ्यांनी पाहण्यात अडचण येत असल्यास.
– चालताना त्रास होत असल्यास.
हेही वाचा: भीतीचे प्रकार चालले बदलत; फोबियाच्या नव्या प्रकारांचा शोध
हे पदार्थ खाणे टाळा-
1) स्मोक्ड, प्रक्रिया केलेले मांस
2) प्रक्रिया केलेले अन्न
3) टेबल मीठ
5) शीतपेये
अशी घ्या काळजी-
स्ट्रोक टाळण्यासाठी हेल्दी पदार्थ खाणे, तसेच रोज नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. सिगरेट, दारू पासून लांब रहावे. कारण यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. त्यामुळे तसेच आहारात भरपूर फायबर असलेल्या फळे, भाज्यांचा समावेश करा. कडधान्ये खा. मुख्य म्हणजे ताळ घेऊ नका. कारण ताण घेतल्यास रक्तदाब वाढतो.
हेही वाचा: तुमच्या मुलांच्या मनात असुरक्षितेची भावना आहे, कशी कराल मदत?
Esakal