अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावेने नुकतीच लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हे दोघं देवदर्शनाला गेले असून सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

सुयश-आयुषी यांनी ज्योतिबा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आहे.
दर्शनानंतरचे फोटो या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यावर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
२१ ऑक्टोबर रोजी सुयश आणि आयुषीने थाटामाटात लग्न केलं. या लग्नसोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकारसुद्धा उपस्थित होते.
विवाहसोहळ्यात आयुशीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती, तर सुयशने पांढऱ्या आणि लाल रंगाचा कुर्ता धोती परिधान केला होता.
७ जुलै रोजी या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here