हिमालयाच्या कुशीत वसलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा भागातील मॅक्लॉड गंज हे असंच ठिकाण जे नेहमीच पर्यटकांना मोहिनी घातली आहे.
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा भागातील मॅक्लॉड गंज हे असंच ठिकाण जे नेहमीच पर्यटकांना मोहिनी घातली आहे. कोणत्याही हिल टाऊनमध्ये गेल्यावर तेथील कॅफेमध्ये जाऊन थंड संध्याकाळचा आनंद लुटणे, हा सुखद अनुभव असतो. कॅफे हे प्रवासाचा अविभाज्य भाग आहेत आणि मॅक्लॉड गंज त्यांनी भरलेलं आहे, त्यामुळे गोंधळ होणं साहजिकच आहे. आता तुम्ही ज्यावेळी या भागाला भेट द्याल तेव्हा पुढे दिलेल्या कॅफेपैकी एखाद्या कॅफेत जाऊन मस्तपैकी वेळ घालवू शकता.

अतरंगी वातावरणाच्या मॅक्लिओड गंज टेकड्यांमधील जोगीवारा रोडवर कार्पे डायम स्थित आहे. कमी आसन क्षमतेमुळे तिथं अधिक आरामदायी वाटतं. टेरेस क्षेत्र हँग आउट आणि आराम करण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तेथील खिडकी असलेली एक कोपऱ्यातील जागा मिळवा आणि हा अनुभव अधिक यादगार व्हावा यासाठी पिझ्झा स्लाइसचा आनंदही घ्या!

प्रवाशांमध्ये एक अतिशय लोकप्रिय ठिकाण ज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मोठ्या खिडक्या आपलं लक्ष बाहेरुनच वेधून घेतात. इटालियन खाद्यपदार्थांव्यतिरिक्त ताजे बेक केलेले केक, कॉफींसह इतर गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता. एकीकडे तुमच्याकडे अप्रतिम तिबेटी मोमोज आहेत, तर दुसरीकडे तुमच्याकडे पिझ्झा आणि पास्ता आहेत. या दोन्हींचा स्वाद तुम्ही चाखू शकता.

टेंपल रोडवर स्थित हा लोकप्रिय कॅफे त्याच्या शांत वातावरणासाठी ओळखला जातो. जे कुणी अशा डोंगरांवर शांतपणे वेळ घालवू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. कॉफी व्यतिरिक्त मूनपीकमध्ये एक रेस्टॉरंट देखील आहे जिथे तुम्ही मूनपीक थाळीच्या प्लेटसह इतर उत्कृष्ट पदार्थांचा आनंद घेऊ शकता.

विस्मयकारक दृश्यांसाठी हा प्रसिद्ध कॅफे खऱ्या अर्थाने उत्कृष्ट आहे. संगीत प्रेमींसाठी तर सीड कॅफे म्हणजे पर्वणीच…कॅफेमधील रॉकस्टार्सची भिंती चित्रे त्याच्या एकूण वातावरणाला बोलकं करतात. तुम्हाला दृश्यांचा आनंद घ्यायचा असेल तर विंडो सीट घ्या. पारंपारिक तिबेटी गाणे आणि नृत्य हे येथील खास आकर्षण आहे.

तुम्ही या भागात असाल तर तुम्हाला शिव कॅफेमध्ये जाऊन या. मॅक्लॉड गंज आणि धर्मशाला या ट्रॅव्हल सर्किटमधील हा कदाचित सर्वात लोकप्रिय कॅफे आहे. भागसू नाग धबधब्याजवळ स्थित हा कॅफे स्वप्नभूमीचे मार्गच जणू…अर्थातच सोशल मीडियावर हा कॅफे प्रसिद्ध आहे आणि तिथे गेल्यावर त्याचा परिपूर्ण अनुभव तुम्हाला येतो.
Esakal