Mental Health Care Tips: आयुष्यात आनंदाने जगण्यासाठी स्वत:वर प्रेम करणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही मोकळेपणाने इतरांवर प्रेम करण्यासाठी सक्षम होऊ शकता. आता स्वत:वर प्रेम करण्याची वेळ आली आहे. वास्तविकता आपण दिवसातील २४ तास सतत काही ना काही करत असतो त्यामुळे स्वत:साठी वेळच काढू शकत नाही. ऑफिस आणि घरातील कामामध्ये आपला दिवस जातो. रात्री झोपताना देखील आपल्या मनात सतत हेच विचार सुरु असतात ती उद्या काय करायचे आहे. महिलांसोबत हे जास्त होते. रात्र-दिवस धावपळ करुनही तुम्ही जर आनंदी नसाल तर त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला स्वत:वर प्रेमच करता येत नाही. सर्वात आधी स्वत:वर प्रेम करायला शिका मग दुसऱ्यांवर प्रेम करायला शिका. आज आम्ही तुम्हाला स्वत:वर प्रेम करण्याच्या पध्दती सांगणार आहोत.

दुसऱ्यांसोबत स्वत:ची तुलना करु नका

आपण नेहमी स्वत:ची तुलना दुसऱ्यांसोबत करत असतो. ही सवय आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते. दुसऱ्यांसोबत स्वत:ची तुलना करणे चुकीचे आहे कारण तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. दुसऱ्यांकडे काय चांगले याचा विचार करण्यापेक्षा स्वत:मध्ये काय चांगले आहे याकडे लक्ष द्या. स्वत:ला कोणापेक्षाही कमी लेखू नका. तुमच्याकडे जे काही चांगले आहे त्याकडे लक्ष द्या आणि त्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा: वैवाहिक आयुष्यात ‘या’ गोष्टींवर तुमचं नियंत्रण आहे का?

लोक काय म्हणतील याची काळजी करू नका

या गोष्टीची काळजी करू नका की लोक तुमच्याबाबत काय विचार करतील याचा विचार करू नका. तुम्ही सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही आणि त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे स्वत:चा वेळ वाया घालवणे आहे. दुसऱ्यांना काय वाटतं याचा विचार करत बसाल तर तुम्ही तुमच्या यशाच्या किंवा ध्येयाच्या वाटचालीमध्ये अडथळा आणु शकता.

हेही वाचा: McLeod Ganj मधील ‘हे’ कॅफे आहेत लय भारी! एकदा नक्की भेट द्या

स्वत:ला चुका करण्याची परवानगी द्या

आपल्याला लहानपण सांगितले जाते की कोणीही परफेक्ट नसते. प्रत्येकजण चूका करतो. पण जस जसे आपण मोठे होऊ लागतो तस तसे आपल्याला चुका करण्यापासून अडविले जाते. पण आपण विसरून जातोय की, चुकाल तर शिकाल. आपण जेव्हा एखादी चूक करतो तेव्हाच आपण त्यातून काहीतरी शिकतो आणि स्वत:ची चूक सुधारू शकतो. चूका करा आणि त्या सुधारुण स्वत:मध्ये बदल करा.

आपल्या भितीवर मात करा आपल्या भिती नकारू नका. आपली भिती काय आहे हे ओळखा आणि त्याचा स्वीकार करा. ही एकप्रकारची एक्सरसाईज आहे जी तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. आपल्या भितीला सामोरे गेल्यावर तुम्हाला तुमच्या समस्या सोडविता येतात. स्वत:साठी चांगले निर्णय घेण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवा आपण नेहमी स्व:वर आणि योग्य निर्णय घेण्याच्या आपल्या क्षमतेवर शंका घेत असतो. आपल्या मनाला सर्व काही माहित असते. तुम्हीच स्वत:ला चांगले ओळखता त्यामुळे तुम्ही स्वत:वर शंका घेण्यापेक्षा तुम्ही एखादे काम चांगल्या प्रकारे करू शकता हे स्वत:ला पटवून द्या.

सर्वात आधी तुम्ही स्वत:ला पुढे ठेवा

आयुष्यात नेहमी स्वत:ला सर्वात पुढे ठेवा. असे करण्यात काही वाईट नाही. कित्येक जण स्वत: आधी दुसऱ्यांचा विचार करतात. हे सर्व काही वेळा किंवा काही परिस्थितींमध्ये योग्य असेल पण त्याची सवय लावून घेऊ नका.तुमच्या तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी ही सवय घातक ठरू शकते. स्वत:चा विचार करण्याची सवय लावा.

स्वत:वर दया करा

जगाला वाईट शब्द बोलण्याची आणि टिका करण्याची सवय असते पण त्याच्याशी स्वत:ला जोडत बसू नका. स्वत:सोबत प्रेमाने संवाद साधा आणि स्वत:ला दोष देणे बंद करा. स्वत:साठी आनंदी राहायला शिका. स्वत:बद्दल वाईट विचार करू नका.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here