दिवाळीच्या (Diwali)सणांमध्ये देशात सर्वांनाच हक्काच्या सुट्टी असतात. शाळा बंद असतात उद्योगधंदे ठप्प असतात तर नोकरी करणाऱ्यांना ही बर्यापैकी या काळात सुट्ट्या मिळतात. दिवाळीत घरोघरी अनेक उत्सव साजरा केला जातो. परंतु दिवाळी बरोबरच पर्यटन करण्याचाही काहींचा मनसुबा असतो आणि हा मनसुबा काही ठिकाणी पूर्ण होऊ शकतो.
या दिवसात सुट्या असल्यामुळे पर्यटनाला अधिक पसंती दिली जाते. यंदाची दिवाळी तुम्ही कुटुंबासह भारतातील निवडक शहरांमध्ये साजरी करू शकता. जेथे तुम्हाला पर्यटनाचा हि आनंद घेता येईल आणि यंदाची दिवाळी वेगळ्या ठिकाणी साजरी केल्याचा आनंदही घेता येईल. भारतातील अशी कोणती ठिकाणे आहेत जेथे तुम्ही पर्यटन आणि दिवाळी साजरी करू शकता जाणून घेऊया.

दिवाळीत वाराणसीला करा गंगा आरती
दिवाळीत वाराणसीला करा गंगा आरती
वाराणसीला वैदिक काळात काशी नगरी म्हणून ओळखले जात होते. या शहरात भगवान शंकराचे निवासस्थान आहे असे मानले जाते. जगभरातून भाविक काशी पर्यटनाला येत असतात. दिवाळीत गंगा आरतीला भाविकांची मोठी गर्दी असते. दिवाळीत तुम्हाला वाराणसीला जाऊन गंगा आरती करायची असेल तर हा पर्याय निवडू शकता.

दिवाळीत वाराणसीला करा गंगा आरती
अमृतसरात अनुभवा दीपोत्सव
जगभर प्रसिद्ध असलेल्या अमृतसर शहराचे नाव इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. याठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक सुवर्ण मंदिराला भेट देण्यासाठी येतात. सुवर्ण मंदिर हा भारताचा वारसा आहे. दिवाळी निमित्त या मंदिराला विशेष सजवले जाते. शिख धर्मात या सणाला खूप महत्व आहे. या दिवशी शिखांचे सहावे गुरू गुरू हरगोविंदजी यांची तुरुंगातून सुटका झाली. म्हणून अमृतसर शहरात दिवाळीत किर्तन, भजनाचे आयोजन केले जाते. मंदिर दिव्यांनी सजवले जाते. जर तुम्ही दिवाळी सेलिब्रेशनचे प्लॅनिंग करत असाल तर अमृतसरला जावू शकता.

कलकत्ता दक्षिणेश्वर, कालीघाट मंदिरात पूजा
कलकत्ता दक्षिणेश्वर, कालीघाट मंदिरात पूजा
पश्चिम बंगालमध्ये माँ कालीची विशेष पूजा केली जाते. पूर्ण राज्यभर कालीपूजेचे आयोजन केले जाते. याठिकाणी दुर्गापूजेपासूनच विशेष पूजेचे आयोजन केले जाते. विशेषत: कलकत्त्यात दुर्गापूजेचा भव्य सोहळा आयोजित केला जातो. दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण शहराला सजावट केली जाते. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही काली पूजा पंडालसह प्रसिद्ध लक्ष्मी नारायण मंदिराला भेट देऊ शकता. तुम्ही दक्षिणेश्वर आणि कालीघाट मंदिरात जाऊन काली पूजेच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
Esakal