मुंबई : मुंबई परिसरातील अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसोबत इतर अनेक मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेल्या शिक्षक भारती च्या शिक्षिकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे याची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या या भेटीत शालेय शिक्षण स्थानिक स्वराज्य संस्था आणि वित्त विभागाच्या दिरंगाईचा फटका शिक्षकांना कसा बसतोय, आदी विषयांची कैफियत मांडण्यात आली.
शिक्षक भारतीकडून मागील 26 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण आझाद मैदानात सुरू आहे. या उपोषनकर्त्या शिक्षकांच्या प्रश्नाकडे शालेय शिक्षण, महापालिका आणि वित्त विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या भेटीदरम्यान करत आपल्या अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षक भारतीच्या उपाध्यक्षा नंदा कांबळे, वैशाली सावंत, मनिषा घार्गे, उमा तिर्लोटकर, दर्शना त्रिकमाणी आदी उपस्थित होत्या.
हेही वाचा: उजनी 110 टक्के! वर्षाचे झाले नियोजन, शेतीसाठी ‘यावेळी’ सुटणार पाणी
यावेळी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लवकरच मी व आमदार कपिल पाटील आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी मिटींग घेऊ व आपल्या रास्त मागण्या मान्य करुन घेऊ असे त्यांनी आश्वस्त असल्याची माहिती उपोषनकर्त्या शिक्षिकानी दिली. तसेच शिक्षकांना उन्हातान्हात बसायला व उपवास करायला लावणे योग्य नाही. महानगरपालिकेला मुलांमधे व शिक्षकांमधे भेद करता येणार नसल्याचे पवार यांनी मत व्यक्त केले असल्याचे सांगितले.

मुंबई
हेही वाचा: हेल्दी फूड : अधूनमधूनचा उपवास फायद्याचा कसा कराल?
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांची ही शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी त्यांनी महिलांना उपोषण करायला लावणं हे योग्य नाही. मी तुमचा प्रश्न दिवाळी झाली की पवार साहेब, आमदार कपिल पाटील व संबधीत सर्वांची मिटींग घेते. परंतु तुम्ही उपोषणं मागे घ्या अशी मी आपल्याला विनंती करते असंही ताईंनी सांगितलं असल्याचे संघटनेच्या उपाध्यक्षा नंदा कांबळे यांनी सांगितले
Esakal