अभिजीत भट्टाचार्य हे नव्वदीच्या दशकातील सर्वात लोकप्रिय गायक आहे. अभिजीत यांनी १००० चित्रपटांमध्ये ६०३४ गाणी गायली आहेत. १९५८ मध्ये जन्म झालेल्या अभिजीत भट्टाचार्य हे कोणत्या न कोणत्या वादांमध्ये अडकले जातात.

एका मुलाखतीमध्ये शाहरूखबद्दल बोलताना म्हणाले, शाहरूख खानने चित्रपटासाठी गायक सोडून सगळ्यांना श्रेय दिलं.त्याने माझ्या आत्म-सम्मानाला ईजा केली आहे. हे वादग्रस्त विधानामुळे शाहरूखचे चाहते त्यांच्यावर नाराज झाले होते.
२०१६ मध्ये चेन्नच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या हत्येनंतर अभिजीत यांनी ट्विटर अकाऊंटवर या प्रकरणाचे वर्णन लव-जिहाद असं केलं होतं. या प्रकरणावरून त्यांचा ट्विटरवर वाद सुरू झाला आणि त्यादरम्यान त्यांनी स्वाती चतुर्वेदींविरोधात अपशब्द वापरले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
२०१८ मध्ये एका महिलेने अभिजीतवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिजीत यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता.
२०१८ च्या ‘मीटू’ प्रकरणात अभिजीत त्यांच नाव आलं होतं. एका विमान परिचारीकेच शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
त्यांनी वादा रहा सनम, ओले ओले, जरा सा झूम लूं मैं आणि झांझरिया यासारखे गाणी गायली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here