आजही काही ठिकाणी महिलांना घर सांभाळेपर्यंतच सक्षम मानले जाते. पण आता बदलत्या काळानुसार महिलांनी हे विचार सोडून घराबरोबरच व्यवसायही सांभाळू शकतात हे दाखवून दिले आहे. मग तो कौटुंबिक व्यवसाय असो किंवा स्वतःचा स्टार्टअप असो. देशातील अशा अनेक व्यावसायिक महिला आहेत ज्यांनी व्यवसायाच्या जगात आपले स्थान निर्माण केले आहे. देशातच नाही तर परदेशातही लोक त्यांना ओळखतात. आज आम्ही तुम्हाला देशातील अशाच पाच श्रीमंत व्यावसायिक महिलांबद्दल सांगणार आहोत.

लीना तिवारी:
फार्मा कंपनीच्या यूएसव्ही इंडियाच्या चेअरपर्सन लीना तिवारी या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर लीना तिवारी 100 लोकांच्या यादीत 43 व्या स्थानावर आहे. लीना तिवारी यांची एकूण संपत्ती 4.4 अब्ज डॉलर आहे. लीना तिवारी यांची कंपनी USV India डायबिटीज आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी औषधांशी संबंधित आहे. लीना तिवारी यांच्या आजोबांनी ही कंपनी स्थापन केली होती.
दिव्या गोकुळनाथ:
फोर्ब्सच्या यादीत 37 वर्षीय दिव्या गोकुळनाथ यांचे नाव भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिलेच्या स्थानावर आहे. दिव्या गोकुळनाथ बायजूज (By JU’S) च्या सह-संस्थापक आहेत. हे एक ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे. कोरोना महामारीच्या काळात शाळा आणि महाविद्यालये बंद असताना बीजूची वाढ झपाट्याने झाली. दिव्या यांचे वार्षिक उत्पन्न 4.05 अब्ज डॉलर झाले आहे.

किरण मुझुमदार शॉ:
किरण मुझुमदार शॉ या भारतातील चौथ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्या 53 व्या क्रमांकावर आहे. किरण मुझुमदार शॉ या भारतातील सर्वात मोठ्या यादीतील बायोफार्मास्युटिकल कंपनी बायोकॉनचे संस्थापक आहेत. या कंपनीची स्थापना 1978 मध्ये झाली. फार्मास्युटिकल उत्पादन क्षेत्रात ही एक मोठी कंपनी आहे. किरण मुझुमदार यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारही मिळाले आहेत. सध्या त्यांची एकूण संपत्ती 3.9 अब्ज डॉलर आहे.

मल्लिका श्रीनिवासन:
फोर्ब्सच्या यादीत मल्लिका श्रीनिवासन यांचे नाव ७३व्या स्थानावर आहे. भारतातील श्रीमंत महिलांमध्येही त्यांचा पाचवा क्रमांक लागतो.
मल्लिका श्रीनिवासन या ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या अध्यक्षा (चेयरपर्सन) आणि व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) आहेत. ही कंपनी 1960 मध्ये सुरू झाली. ही कंपनी जगातील तिसर्‍या मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. मल्लिका श्रीनिवासन यांची एकूण संपत्ती 2.89 अब्ज डॉलर आहे.
सावित्री जिंदाल:
फोर्ब्सच्या यादीमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदाल यांचे नाव समाविष्ट आहे. सावित्री जिंदाल एकूण यादीत सातव्या स्थानावर आहे. सावित्री जिंदाल या ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. जिंदाल ग्रुप हा स्टील, पॉवर, सिमेंट आणि पायाभूत सुविधांशी संबंधित व्यवसाय आहे. सावित्री जिंदाल यांचे पती ओमप्रकाश जिंदाल यांनी हा व्यवसाय समूह स्थापन केला होता. 2005 मध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सावित्री जिंदाल आणि त्यांच्या मुलांनी व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी घेतली. सावित्री जिंदाल या ७१ वर्षांच्या असून त्या हरियाणा सरकारमध्ये मंत्रीही राहिल्या आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here