प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. एखाद्या व्यक्तीसाठी वाटणारे सकारात्मक ओढ, जवळीक आणि त्याच्यावरील विश्वास या आनंदाच्या भावनेतून प्रेम आणि काळजी व्यक्त करता येते. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम व्यक्त करता तेव्हा तुमचा चेहरा आनंदाने उजळून निघतो. प्रेमात पडणे हा खूप सुंदर अनुभव असून तो प्रत्येकासाठी वेगळा असतो. तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार मिळाला आहे की नाही याबाबत विचार करण्याआधी तुम्ही खरचं प्रेमात पडला आहात का याची खात्री करा. तुम्ही खरचं प्रेमात पडला आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी काही संकेत आहे जे तुम्हाला माहिती असावे.

जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत असता तेव्हा तुम्ही स्वत:च्या प्रेमात पडता –
तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर तुम्ही स्वत:च्याही प्रेमात पडल्याची काहीच उदाहरणे जगात सापडतील. त्यांना पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात एक चमक येते आणि तुमच्या ओठांवर स्माईल येते आणि ह्रदयामध्ये एक भावना निर्माण होतेय. तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीच्या आसपास असता तेव्हा तुम्ही स्वत:च्या आनंदी व्यक्तीमत्वाला भेटता. तुम्हालाही जर हे सर्व जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच प्रेमात आहात.
तुम्ही त्या व्यक्तीला प्राधान्य देता –
तुम्ही जर प्रेमात असाल तर तुम्ही आपोआप त्या व्यक्तीला प्राधान्य देऊ लागता. तुम्हाला त्या व्यक्तीसोबत वेळा घालवावा, हसावे- रडावे आणि कायम त्यांच्या सोबत असावे असे तुम्हाला वाटते. तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला प्राधान्य देण्यासाठी तुमचा वेळ आणि श्रम करत असाला तर तुम्ही नक्कीच प्रेमात पडला आहात.
तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा असते –
तुम्ही जर इंट्रोवर्ट असाल तरी तुम्ही त्या व्यक्तीसाठी काहीतरी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही प्रेमात आहात. त्या खास व्यक्तीनेही तुम्हाला लाईक करावे या इच्छेमुळे तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करु पाहता.
तुम्ही त्यांच्या मतांना किंमत देता

तुम्ही त्या व्यक्तीच्या मताला स्वत:च्या मता इतकी किंमत्त देत असाल तर तुम्हाला त्यांची किती काळजी आहे किंवा किती प्रेम आहे ते दिसते. तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ लागता विशेषत: जेव्हा प्रश्न तुमच्या भवितव्याचा असतो.

प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या खास व्यक्तीची आठवण करून देते –
प्रेमात पडल्यानंतर तुम्ही सतत त्या व्यक्तीचाच विचार करता. यालाच प्रेमाची जादू म्हणतात. तुम्हाला प्रत्येक गोष्ट पाहून त्याच व्यक्तीची आठवण होते कारण तुमचे मन, आत्मा आणि ह्रदय त्यांच व्यक्तीसोबत असते. एवढंच नव्हे तर तुम्ही जे कपडे घालता, जे खाता किंवा पाहता त्यातूनही तुम्हाला तुम्ही एकत्र घालवेल्या क्षणांची आठवण येते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here