कलाविश्वात असे बरेच कलाकार आहेत ज्यांची आडनावं ही चाहत्यांना माहित नाहीत. काही कलाकार त्यांच्या मूळ नावापुढे आडनाव लावत नाहीत, तर काही कलाकार त्यांच्या वडिलांचं नाव आडनाव म्हणून लावतात. अशा काही प्रसिद्ध कलाकारांची आडनावं काय आहेत, ते जाणून घेऊयात..

सायली संजीव- मराठी चित्रपटसृष्टीतील सायली संजीवचा चाहतावर्ग मोठा आहे. सायलीचं आडनाव चांदसारकर असं आहे.
अभिनेता ललित प्रभाकर हा मराठी इंडस्ट्रीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जातो. ललितचं आडनाव भदाणे असं आहे.
अजय-अतुल ही संगीत क्षेत्रातील लोकप्रिय जोडी. या भावंडांचं आडनाव गोगावले असं आहे.
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता सुभाष. अमृताचं आडनाव ठेंबरे असं आहे.
‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री. तिचं संपूर्ण नाव भाग्यश्री पटवर्धन असं आहे.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका सुनील. रसिकाचं आडनाव धबडगावकर आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here