दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘पुष्पा’ चित्रपटानं संपूर्ण भारतात प्रचंड लोकप्रियता मिळवलीय.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘पुष्पा’ चित्रपटानं संपूर्ण भारतात प्रचंड लोकप्रियता मिळवलीय. ख्रिसमसच्या हंगामात प्रदर्शनाची तारीख निश्चित केल्यामुळे सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट खूप हिट होईल अशी अपेक्षा आहे.
टीम पुष्पानं ‘सामी सामी’ चित्रपटातील तिसरे गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्यात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना आहेत. हे व्हिडिओ गाणे प्रदर्शित होताच यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.
तेलुगुमध्ये ‘सामी सामी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अल्लू आणि रश्मिका यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
व्हिडिओमध्ये रश्मिका आणि अर्जुनची देसी स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. त्याचबरोबर तिचा अभिनयही अप्रतिम आहे.
आदित्य म्युझिक या यूट्यूब चॅनेलवर गुरुवारी (28 ऑक्टोबर) अल्लू अर्जुनचे हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याला एकाच दिवसात 90 लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हे गाणे प्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांनी सोशल मीडियावर जबरदस्त धुमाकूळ घातला होता. ‘पुष्पा’ चित्रपट आणि ‘सामी सामी’ हे गाणे ट्विटरवर ट्रेंड करू लागलेय.
‘सामी सामी’ गाण्याआधी निर्मात्यांनी ‘पुष्पा’ चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित केली आहेत. त्यात ‘डाको डाको मेका’ आणि ‘श्री वल्ली’ या गाण्यांचा समावेश आहे.
या चित्रपटाच्या पोस्टरपासून ते गाण्याच्या टिझर व्हिडिओपर्यंत सर्व काही चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगलीय. यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.
‘सामी सामी’ या गाण्याच्या मेकिंगबद्दल बोलायचं झालं, तर मोनिका यादवनं आवाज दिला आहे आणि चंद्रबोसनं त्याचे बोल दिले आहेत. संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे. रिदम कल्याण यांचं आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here