अलीकडच्या काही दिवसांत चांदीच्या दागिन्यांची खूप क्रेझ आहे. दिवाळीमध्ये तुम्ही पैठणी-कांजीवरम साड्यांसोबत चांदीचे दागिने घालू शकता. यंदा ‘माँग टीका’ हाही एक दागिना फॅशनमध्ये आहे, आणि तो खूप छानही दिसतो. कुंदनचे चोकर खूप छान दिसतात. बांगड्यांमध्ये सोन्याच्या बांगड्या, कंगन, मोती तोडे, रेशम किंवा गोठावरचे कडे साडी आणि पारंपरिक ड्रेससोबतही शोभतात. यावर्षीची सगळ्यात महत्त्वाची ॲक्सेसरी म्हणजे ‘मास्क’होय! मॅचिंग कपड्याच्या मास्कसोबत वेगवेगळ्या डिझाइनर मास्कचीसुद्धा बाजारात मागणी आहे. पॅचवर्क केलेले, मोत्याचे वर्क केलेले, एम्ब्रॉयडरी केलेले असे खूप सुंदर सुंदर मास्क आहेत. महिलांसाठी तयार हेअर स्टाइल्सही आहेत, ज्या तुम्ही झटपट वापरू शकता. साडी असो, लहंगा किंवा शरारा. कोणत्याही कपड्या सोबत झुमका मॅच होतो. फक्त सोन्याचे, कुंदनचे, मिनाकारी केलेले, असे वेगवेगळे झुमके फॅशनमध्ये आहेत. ऑक्सिडाइज झुमकेदेखील पारंपरिक साडीवर छान दिसतात. काही ड्रेसेससोबत बेल्टची पुन्हा एकदा फॅशन आली आहे. लेदर बेल्ट वेस्टर्न ड्रेससोबत छान दिसतात. बेल्टवाली साडीही इन फॅशन आहे. दिवाळीच्या ड्रेस, साडीसोबत सोनेरी रंगाचे पोटली बॅग फॅशनमध्ये आहेत. दिवाळीत कपडे आणि दागिने यांच्याबरोबर नवीन ॲक्सेसरीजही घेतल्या जातात. हेअर ॲक्सेसरीजमध्ये लहान मुलींसाठी टियारा हा फुलांचा गोलाकार मुकुट खूप छान दिसतो. तरुणींसाठी हेअर बँड आणि हेअरक्लिप्समध्ये भरपूर प्रकार आहेत. मॅचिंग रंगाबरोबरच स्टोन्स, स्टडेड हेअर क्लिप्सना मागणी आहे. फ्लोरल मोठ्या अंगठ्या हातात उठून दिसतात. बहुपदरी मोतीमाळा आणि मॅचिंग स्टोन ज्वेलरी देखील ट्रेंडमध्ये आहे. याचबरोबर, साडी-ड्रेसला मॅच होणारी ‘फॅब्रिक ज्वेलरी’ विशेषतः पैठणी व खण ज्वेलरीदेखील फॅशनमध्ये आहे. फुटवेअरमध्ये पारंपरिक मोजडी आणि वर्क केलेले चप्पल्स यांना जास्त मागणी आहे. वेस्टर्न कपड्यांसोबत बूटची फॅशन आहे. क्लचेसमध्येसुद्धा खूप व्हरायटी आहे. मेटल, लेदर, स्लिंग बॅग तरुणींना जास्त आवडत आहेत.