सोयगाव (जि. नाशिक) : दिवाळी सण मोठा, नाही आनंदाचा तोटा’ या पंक्तीप्रमाणे दीपोत्सवाची लगबग वाढू लागली आहे. दिवाळी सण म्हटला म्हणजे फराळ व गोडधोड मिठाईचा आनंद वेगळाच असतो. मात्र, यंदाच्या दिवाळीत रेडिमेड व आचाऱ्याकडून फराळ बनविण्याचा कल असल्याचे दिसून येते. फराळासाठीची सर्व तयार सामग्री बाजारात उपलब्ध आहे.

विक्रीसाठी लागलेले रेडिमेड फराळाचे दुकान.

विक्रीसाठी लागलेले रेडिमेड फराळाचे दुकान.

‘आपल्या हातची चवच न्यारी’

शहरात आपल्या परिसरात आलेले आचारी यांच्याकडून स्वतःचा किराणा देऊन विविध प्रकारचे तिखट व गोड पदार्थ बनवून घेतात. ग्रामीण भागातील दिवाळी सणाच्या दरम्यान शेतीच्या कामांची घाई असते. काही शेतकरी कुटुंबांतील सुगरण गृहिणी घरच्या घरी फराळ बनवितात. सख्यांच्या मदतीने बनविलेला फराळ ‘आपल्या हातची चवच न्यारी’ अशी महती सांगणारा ठरतो. बदलत्या काळाच्या प्रवाहात वेळ नसलेले ग्राहकांची रेडिमेड फराळाची गरज लक्षात घेऊन विक्रेत्यांकडून तसा माल तयार करून घेतात. काही दुकानदारांनी तर चक्क आपल्या दुकानासमोर मंडप टाकून तशी व्यवस्था केल्याने जागेवरच फराळ बनविला जात आहे.

हेही वाचा: वनविभागाच्या जमिनीवरच होतेय गांजाची शेती; पोलिस अ‍ॅक्शन मोडवर

अनेक जण किराणा दुकानात असलेली गर्दी, माल घेऊन आचारी बोलावून तयार करण्याची तसदी न घेता रेडिमेड परंपरागत विक्री करणाऱ्यांकडून फराळाची पाकिटे घेणे पसंत करतात. मुळात तयार फराळाने वेळ व दगदग वाचते, त्यातच रेडिमेड फराळ परवडतो, असेही अनेक जण सांगतात. बाजारातून आणलेल्या फराळाने आवश्यक तेवढे रुपये किलो मजुरी घेतात. विविध नवे पदार्थ करणाऱ्या आचाऱ्यांना मात्र मोठी मागणी असते.

”यंदा रेडिमेड फराळाला चंगली मागणी आहे. रेडिमेड फरालामुळे घरात होणारी धावपळ वाचते. व वेळची बचत होते. त्यामुळे अनेकांची रेडीमेड फराळाला चांगली मागणी आहे.” – कुमुद पवार, गृहिणी

हेही वाचा: अपयशाची चव चाखलेल्या स्वप्नीलने केली यशाची हॅट्रिक!

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here