वर्षभर आतुरतेने वाट पाहत असलेला सण दिवाळी हा जवळ आला आहे. सणं म्हटलं प्रत्येकजण उत्साहाने तो साजरा करतात आणि आपल्या आवडीच्या पदार्थावर ताव सर्वचजण मारतात. त्यात दिवाळी म्हटलं की, काय खाऊ आणि काय नको असे प्रत्येकाला वाटते. दिवाळीच्या फराळातीस लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळ्या अशा सर्व पदार्थांचा आपण मनसोक्त आस्वाद घेतो. कित्येकदा आपण दिवाळीचा फराळ इतका खातो की, शेवटी आपले वजन वाढते. त्यामुळे कित्येकदा आपल्याला खाण्यावर संयम ठेवावा लागतो, पण सणसुदीला चांगले पदार्थ नाही खाणार तर कधी खाणार? तुम्हाला जर सणासुदीला मनसोक्त आवडीचे पदार्थ खायचे असतील आणि तुमचे वजन वाढू नये असे वाटत असेल तर त्यावर एक उपाय आहे. तुम्हाला दररोज फक्त काही योगासन करायाचे आहेत. तुम्ही नियमित योगा करत असाल तर उत्तमच पण नसेल करत तर तुम्ही योगासन सुरु करू शकता. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.

उभे राहून करता येईल असे अगदी सोपे आसान आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती समस्थीत उभी असते आणि तीचे शरीर पृथ्वी आणि आकाश जोडण्याचा प्रयत्न करते. आसान करण्यासाठी तुम्हाला ताट उभे राहवे लागेल त्यानंतर हात वर करून तळवे एकमेकांना जोडून ते हवेत वरच्या बाजूला स्ट्रेच करावे लागतात. संपूर्ण शरीरात आणि शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये चेतना निर्माण होईल. या आसानामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि स्थायू बळकट आणि चपळ होतात.

हे आसन करताना साईड स्ट्रेचिंग करता येते. आसन करण्यासाठी सुरूवातीला आपला एक पाय 90 अंशामध्ये ठेवा आणि दुसरा पाय विरुद्ध दिशेला स्ट्रेच करा. आता 90 अंशाच्या काटकोन स्थितीमध्ये असलेल्या दिशेला कंबरेपासून खाली वाका आणि विरुद्ध दिशेने कानाच्यावर हात स्ट्रेच करा आणि दुसऱ्या पायाच्या समोर जमिनीवर हात टेकवा. या आसानामुळे फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यास आणि शक्ती वाढण्यास मदत होते.

या आसानाची सुरूवात ताडासन पासून होते. दोन्ही पायांमध्ये 3 ते 4 फुटाचे अंतर ठेवा आणि खांद्याच्या रेषेमध्ये हात पसरवा. आता पाऊले जमिनीवर रोवून एका पायाचा 90 अंशाचा कोन तयार करा आणि दुसरा पाय मागे स्ट्रेच करा. या आसनामुळे मसल्सची ताकद वाढते आमि पुर्ण शरीर सक्रिय राहते.

हे आसन म्हणजे सुर्य नमस्कारातील एक स्थिती आहे. हे आसन करण्यासाठी सुरवातीला एक पाय मागे घ्या आणि दुसरा पाय पुढे घेऊन 90 अंशाचा काटकोन करा. त्यानंतर मागचा पाय मागील बाजूला स्ट्रेच करा. हात वरच्या बाजुला घेऊन हाताचे दोन्ही तळवे एकमेकांना जोडा आणि कंबरेपासून मागच्या बाजूला शक्य तितके स्ट्रेच करा. या आसनामुळे मेटॉलिजम आणि पचनक्रिया सुधारते.

या आसनामुळे तुमच्या पोटाच्या पुढील आणि बाजुच्या मसल्सवर काम करते. हे आसन करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर बसा. तुमचे हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ ठेवा. पाठ सरळ ठेवा. आता तुमचे पाय आणि हाथ एकत्रच जमिनीवरून हवेत उचला आणि पोटावर भार देत पोटावर काही वेळ असेच थांबा. 45 अंशाच्या कोनामध्ये म्हणजेच व्हि-शेप मध्ये शरिराचा आकार तयार करा. 6 सेकंद अशाच स्थितीमध्ये राहा आणि मोठा श्वास घेण्याचा प्रयत्न करा.

हे आसन करण्यासाठी जमिनीवर पाय पसरून बसा आणि पाय पुढच्या बाजुला स्ट्रेच करा. आता थोडे खाली वाकून गुडघ्याला डोके टेकविण्याचा प्रयत्न करा. हे आसन गुडघा, नितंब आणि पाठीच्या कण्याचे स्ट्रेचिंग करण्यासाठी फायदेशीर ठरते.
Esakal